Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंजबचत गटांच्या नावाखाली अवैध सावकारी…-पाच ते दहा टक्क्यांपर्यंत वसूल केला जातो व्याज..

बचत गटांच्या नावाखाली अवैध सावकारी…-पाच ते दहा टक्क्यांपर्यंत वसूल केला जातो व्याज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-बचतगटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार करीत आर्थिक उन्नती साधावी म्हणून शासन प्रयत्नरत आहे.त्यासाठी शासन उमेद अभियानाच्या माध्यमातून कमी दरात कर्ज उपलब्ध करून देते.मात्र काही बचतगटाच्या महिलांनी या कर्जाचा उपयोग व्यवसायासाठी न करता अधिक व्याजाने (पाच ते दहा टक्के) कर्ज देत सावकारी करीत असल्याचे चित्र तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात दिसत आहे. त्यामुळे शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.

शेतीचा हंगाम बिनभरवशाचा असल्याने व महागाई वाढल्याने शेतकरी,शेतमजुरांचे आर्थिक गणित बिघडते.अशा परिस्थितीत बँकांचा दरवाजा ठोठावला जातो.मात्र,बँकेच्या क्लिष्ट त्रुटी पाहून शेतकरीच चक्रावतो.बँक नको ते कारण सांगून कर्ज देण्यास टाळत असल्याने पर्यायाने शेतमजुरांना बाहेरील कर्ज घ्यावे लागते.याचाच फायदा काही बचतगटाच्या नावावर करीत आहेत.बचतगटाच्या माध्यमातून महिलांची उन्नती साधावी,यासाठी शासनाचा उद्देश चांगला असला तरी काही महिला गटाच्या नावाखाली इतरांना व्याजाने पैसे देतात.व्याजाचा धंदा करीत आहेत.विशेष म्हणजे, हे व्याज एक किंवा दोन टक्के नसते तर थेट पाच ते दहा टक्क्यांपर्यंत व्याज वसूल केले जात आहे.याकडे प्रशासनाने लक्ष देऊन आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी व बेकायदेशीर सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश २०१४ हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे.या नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्यास पाच वर्षापर्यंत शिक्षा किवा ५० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!