Sunday, August 30, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज शहराच्या चौका-चौकात सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे- सपाने मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी

देसाईगंज शहराच्या चौका-चौकात सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे- सपाने मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-देसाईगंज शहरातील चौका -चौकात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे; अशी मागणी आज दिनांक-१८ जून रोजी समाजवादी पार्टी गडचिरोली च्या वतीने निवेदनाद्वारे देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांच्याकडे केले आहे.

देसाईगंज शहरात जबरी चोरी तसेच इतर भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.काही दिवसांपूर्वी शहरातील स्थानिक गांधी वॉर्डातील रहिवासी हरिजितसिंग सलुजा यांच्या घरी रात्री १२ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी १९ लाख रुपयांवर डल्ला मारत पोबारा केला होता.मात्र अजूनही चोरी करणाऱ्या टोळीचा थांगपत्ता अजूनही लागलेला नाही.तसेच देसाईगंज शहरात अनेक बहुरूपी बनाव 

घेऊन फिरत आहेत़; अशांची योग्य चौकशी होणे आवश्यक आहे.मागील महिन्यात देसाईगंज शहरा पासून काही अंतरावर जैव विविधता उद्यान नाजिक वडसा-आरमोरी मार्गावर सकाळच्या सुमारास १४ वर्षीय शर्वरी पदमाकर बनकर या युवतीचा अज्ञात वाहणाच्या धडकेत मृत्यू झाला.मात्र,अजूनही सदर वाहणाचा थांगपत्ता लागलेला नाही.अशा घटना शहरात घडू लागल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असते तर पोलिसांना वाहणाचा शोध घेण्यात सोपे झाले असते.शहरात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पुरावे मिळण्याच्या उद्देष्याने देसाईगंज शहरातील संपूर्ण मुख्य चौका-चौकात नगर पालिका प्रशासनाने सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे; अशी मागणी आज मंगळवारी गडचिरोली समाजवादी पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

सदर निवेदन सादर करतेवेळी,जिल्हा कोषाध्यक्ष जिब्राईल शेख,देसाईगंज तालुकाध्यक्ष डोमा दिवटे, देसाईगंज तालुका महासचिव प्रीतम जणबंधू,जिल्हा कार्यकारिणी सदस्य जावेद खान तसेच सपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

भरधाव वेगात असलेल्या कारने एकाला चिरडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन...

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!