Sunday, August 9, 2026
Homeगोंदियाअखेर 'त्या' प्रॉपर्टी डिलरचा खासगी रुग्णालयात झाला मृत्यू…-पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपींना...

अखेर ‘त्या’ प्रॉपर्टी डिलरचा खासगी रुग्णालयात झाला मृत्यू…-पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपींना केली अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- जमिनीच्या आर्थिक देवाण-घेवाणीतूनच प्रापर्टी खरेदी-विक्रीचे काम करणाऱ्या तरुणावर हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना शहरातील छोटा गोंदिया परिसरातील किसान चौक येथे रविवारी दि.९ जून रोजी सकाळी ९:४५ वाजता घडली.महेश विजयकुमार दखने वय ३६ वर्षे रा.छोटा गोंदिया या प्रापर्टी डीलरचा उपचार घेताना खासगी रुग्णालयात ९ जून रोजी रात्री ९:३० वाजता मृत्यू झाला.याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

शहरातील पतंगा चौक ते तिरोडा बायपास रोड परिसरातील किसान चौक येथील जान्हवी ऑटो रिपेअरिंग सेंटर येथे रविवारी दि.९ जून रोजी सकाळी ९:४५ वाजताच्या दरम्यान महेश विजयकुमार दखने वय ३६ वर्षे हे दुचाकी वाहन क्रमांक एमएच- ३५-एव्ही ९५५० ने गेले होते.यावेळी हल्लेखोरांनी त्याला घेरले व त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला हतोडा,कुऱ्हाडी व तलवार या शस्त्रांनी वार करून जखमी केले.यात रक्तस्राव झाल्याने महेश जमिनीवर पडला व ओरडण्याचा आवाज केल्याने हल्लेखोर पळून गेले होते.या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत सूर्यवंशी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनी वेगवेगळे पथक तयार केले.आरोपीतांचा त्वरित शोध सुरू केला.अनेक संशयित आरोपींचा तपास केल्यानंतर व घटनास्थळावरून प्राप्त झालेली माहिती,मिळालेली गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या चार तासांत आरोपींना अटक करण्यात आली.ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा,उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम,सहायक पोलिस निरीक्षक संजय पांढरे,पोलिस उपनिरीक्षक मंगेश वानखडे,शरद सैंदाने,चन्नावार, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम थेर, पोलिस हवालदार जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपालसिंह भाटिया, निशिकांत लोंदासे यांनी केली आहे.

महेश दखने यांचा खून करणाऱ्या आरोपीत देवेंद्र ऊर्फ देवा तुकाराम कापसे वय ४८ वर्षे रा.शिवमंदिर, आंबाटोली, फुलचूर गोंदिया,सुरेंद्र हरिदास मटाले वय ३२ वर्षे रा.शिवणी / इंदिरानगर,चिरचाळबांध, ता. आमगाव,मोरेश्वर चैतराम मटाले वय २६ वर्षे रा. मोहगाव, (सुप- लीपार) ता.आमगाव व नरेश नारायण तरोणे वय ३८ वर्षे रा.आर.टी.ओ.ऑफिसजवळ,गोंदिया यांना अटक करण्यात आली.या आरोपींना १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश वानखडे करीत आहेत.

महेश विजयकुमार दखने यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चौघांवर कामिनी महेश दखने वय ३४ वर्षे रा.छोटा गोंदिया यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३०७,३४ अन्वये ९ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.महेश दखने याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तपासात भादंविच्या कलम ३०२ नुसार वाढ करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!