उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज नगर परिषद हद्दीत असलेल्या जुनी वडसा येथे होतकरू तरुण युवक-युवतींसाठी क्रिडांगण संकुलाची नितांत गरज आहे.धावपट्टी,गोळाफेक,मैदानी खेळ तसेच इतर बाबिंकरिता जुनी वडसा येथील खुली असलेली जागा क्रिडांगण संकुलासाठी देण्यात यावी; अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक तथा देसाईगंज भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सचिन खरकाटे तसेच ग्रामस्थांनी मिळून नगर परिषदेचे मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांच्याकडे केली आहे.
खुल्या असलेल्या जागेवर जुनी वडसा येथील ग्रामस्थ परंपरागत बैलांचा शंकरपट भरवित आले आहेत.त्यामुळे पटाचे दान म्हणुन सदरची जागा ही राखीव ठेवण्यात आली आहे.गावठाण नंबरच्या जागेवर नगर परिषद कार्यालयाकडुन जिम व सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे.मात्र,पटाचे दान असलेल्या खुल्याजागेवर गावकऱ्यांनी वैयक्तिक वर्गणी गोळा तरूण मुला-मुलींसाठी तात्पुरत्या स्वरूपाची धावपटटी तयार करण्यात आली आहे.तसेच करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात आले आहे.त्यामुळे याचा फायदा जुनी वडसा वासियांना तसेच तरूण मुला-मुलींना झालेला आहे.अनेक तरूण-तरुणी तयार करण्यात आलेल्या क्रीडा जागेवर मेहनत केल्याने अशांची सरकारी पदावर नेमणुक झाली आहे.त्यामुळे गावातील जनतेला व तरूण मुला-मुलींसाठी सदर जागेवर पक्क्या स्वरूपाचे नवीन क्रिडांगण संकुलाची अत्यंत आवश्यकता असल्याने; सदरची जागा क्रिडांगण संकुलासाठी देण्यात यावी; असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

