Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील वन विभागात चालले तरी काय?-सर्वात जास्त आंदोलने व उपोषण वन...

गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागात चालले तरी काय?-सर्वात जास्त आंदोलने व उपोषण वन विभागाच्या विरोधात…  

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली:-गडचिरोली जिल्हा हा मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात आदिवासी,बहुल,नक्षलग्रस्त,मागासलेला व घनदाट जंगलाने व्याप्त जिल्हा म्हणून ओळखला जातो.हा जिल्हा अतिदुर्गम,डोंगर दऱ्याने व्याप्त व अविकसित असून जास्तीत जास्त क्षेत्र जंगलाने वेढलेला आहे.अशातच गडचिरोली जिल्ह्याच्या वन विभागा विरोधात भ्रष्टाचार,अवैध उत्खनन,अवैध वृक्ष तोड,निकृष्ट दर्जाची बांधकामे,गैरव्यवहार,साहित्य खरेदी घोळ व इतर अशा अनेक बाबतीत सर्वात जास्त आंदोलने तसेच आमरण उपोषण करण्यात येत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागात चालले तरी काय? असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

मागील काही आठड्यांपूर्वी अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी जिल्ह्यातील वन कर्मचारी निलंबित झाले होते.तत्पूर्वी मागील वर्षात सामाजिक वनीकरण विभाग देसाईगंज विरोधात तीनदा आमरण उपोषणाचा पावित्रा घेण्यात आला होता.जिल्ह्यामध्ये साहित्य घोळ बाबतीत सेटिंग झाल्याच्या चर्चांना काही काळ उधाण आले होते.मनमानी कारभारामुळे निलंबनाचे प्रकरण होऊन गेलेत; अशा अनेक झोलबा पाटलाच्या वाड्या सारख्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत.अशातच आता जिल्ह्यातील  एटापल्ली तालुक्यांतर्गत येत असलेल्या मेंढरी-गर्दैवाडा या रस्ता कामात मोठ्या प्रमाणात वनपरिक्षेत्रातून अवैधरित्या गिट्टी व मुरुमाचे उत्खनन करून वापर करण्यात आला आहे.सदर प्रकार संबंधित वनअधिकारी,कर्मचाऱ्यांसह कंत्राटदाराच्या संगमनाताने झाल्याचा आरोप करीत संबंधितांवर कारवाई करण्यात यावी; या मागणीला घेऊन  सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्णा वाघाडे यांनी गुरुवारी बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे.तसेच रेक्कलमट्टा ते रेंगाटोला या रस्ता बांधकामातही गट्टा व एटापल्ली वनपरिक्षेत्रातून अवैधरित्या मुरूम  उत्खनन केला गेल्याचा आरोप श्रीकृष्णा वाघाडे यांनी केला आहे.यासंदर्भात वनविभागाच्या वरिष्ठांकडे तक्रार करुनही कोणतीही कारवाई न झाल्याने वाघाडे यांनी गुरुवारपासून मुख्य वनसंरक्षक कार्यायासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे.एकदा-दोनदा तक्रार देऊनही संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई कां करण्यात येत नाही? प्रकरण गंभीर स्वरूपाचा दिसू लागल्यासच काही जणांच्या डोळ्यांच्या पापण्या उघडू लागतात.याला काय म्हणावे? अशांवर आळा घालणार कोण? त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागात चालले तरी काय?असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जातो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!