Wednesday, August 12, 2026
Homeभंडाराभंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी…

भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 भंडारा :- महाराष्ट्रात सध्या तापमानाचा पारा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.दुपारच्या दरम्यान उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे.एकीकडे आरोग्य विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे.वाढत्या तापमानामुळे अनेकांना त्रास होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.भंडारा जिल्ह्याच्या तापमानात सतत वाढ होत आहे.जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली असून जिल्ह्यात आज ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.वाढत्या तापमानामुळे शहरातील रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत.तसेच नागरिकांना घराबाहेर पडू नये; असा सल्ला दिला जात आहे.

त्यातच आता भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे.भास्कर तरारे वय ५१ वर्षे असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.सदर व्यक्ती भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथे वास्तव्यास होता.उन्हाचा त्रास जाणवू लागल्याने भास्कर तरारे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान भास्कर यांचा मृत्यू झाला.उष्माघाताचा पहिला बळी भंडारा जिल्ह्यात गेला असून आणखी पाच रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयाला उपचार घेण्यासाठी दाखल आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण प्राप्त.. -कोणत्याही शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाईल..

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंगळवारी 'राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा)विधेयक २०२६' ला मंजुरी दिल्याने आता राष्ट्रीय गीत असलेल्या 'वंदे मातरम्'ला...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला.. – कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्याने सांगितला आनंददायक अनुभव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)योजनेअंतर्गत मी ३० पाईपची मागणी केली होती.पाईप खरेदी केल्यानंतर अवघ्या ८ दिवसांच्या आत माझ्या खात्यात ८०...

कारची ट्रकला मागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर...

सर्पदंश दुर्घटनेनंतर प्रशासनाची कठोर कारवाई; मुख्याध्यापक व दोन वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल.. – आश्रमशाळा बंद करण्याची शासनाकडे शिफारस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने गंभीर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!