Monday, August 10, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा तालुक्यातील सर्वच रेतीघाटांची होणार सखोल चौकशी…-तहसीलदार रमेश कुंभारे यांनी कर्मचाऱ्यांना दिले...

कुरखेडा तालुक्यातील सर्वच रेतीघाटांची होणार सखोल चौकशी…-तहसीलदार रमेश कुंभारे यांनी कर्मचाऱ्यांना दिले निर्देश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

कुरखेडा(गडचिरोली) :- कुरखेडा तालुक्यातील सती नदीपात्रातून अवैधपणे रेती तस्करीला उधाण आले होते.मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे रेती चोरट्यांकडून अवैध रेती उत्खनन करून सती नदीचे पात्र पोखरून काढण्यात आले आहे.अशातच ‘चोरी तर चोरी,वरून शिनाजोरी’ करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.त्यामुळे तहसीलदार रमेश कुंभारे यांनी कुरखेडा तालुक्यातील सर्वच रेतीघाटांचे पंचनामे करीत कुठून? किती? रेती काढण्यात आली आहे; याची तपासणी करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात गेली दोन ते तीन वर्षांपासून रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली असल्याने सर्वत्र अवैध रेतीचे उत्खनन करून रात्रीच्या अंधारात माल सुताव; अशी भूमिका रेती तस्करांकडून घेतली जात आहे.सुरुवातील स्थानिक चोरट्यांकडून रेती तस्करी केली जायची; मात्र आता स्थानिक आणि आणिक बाहेरील तस्कर झटपट पैश्याच्या लालसेपोटी रेती तस्करीच्या धंद्यात तितक्याच जोमाने भिडले आहेत. अशातच चोऱ्या करूनही अनेकजण मुजोऱ्या करीत आहेत.असाच प्रकार कुरखेडा तालुक्यात घडून आला आहे.नागपूर येथील काही गुंड प्रवृत्तीचे लोक रेती तस्करीत सक्रिय असून त्यांनी दोन वेळा गस्ती पथकाच्या वाहनाला अडवून कर्तव्यावर असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना धमकावल्याचे सांगितले जाते.यासंदर्भात पथकातील मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनही दिले.मात्र तरीही रेती तस्करांकडून मुजोरी करीत रेती काढण्याचे काम सुरूच आहे.अशांवर आळा घालण्यासाठी तहसिलदार कुंभारे यांनी कंबर कसली असून तालुक्यातील सर्वच रेतीघाटाची सखोल चौकशी करुन घाटातील किती रेती कमी झाली; याची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!