Saturday, August 8, 2026
Homeआरमोरीप्रियकर आणि अल्पवयीन प्रेयसीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच..-आरमोरी शहरातील प्रकरण..

प्रियकर आणि अल्पवयीन प्रेयसीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच..-आरमोरी शहरातील प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी शहरामध्ये गुरुवार दिनांक- १६ मे रोजी ‘जियेंगे तो एकसाथ; मरेंगे तो दोनो साथ’ असे प्रियकर व अल्पवयीन प्रेयसी यांनी आणाभाका घेत दोघांनीही एकाच वेळेस मित्राच्या भाड्याच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या नादात प्रियकर याचा मृत्यू झाला तर युवती थोडक्यात बचावल्याची घटना सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्याने  उघडकीस आली.सदर प्रकरणात बचावलेली युवती अद्यापही बेशुद्धावस्थेत असल्याने घटनेमागील रहस्य अजूनही कायम आहे.त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला आणि तो अचानक घेतला की पूर्वनियोजित होता? हे शोधण्याचे आव्हान आरमोरी पोलिसांसमोर आहे.

आत्महत्या प्रकरणातील,मृत युवक राहुल गजानन सावसाकडे वय २० वर्षे हा मजुरी करत असताना त्याचे सदर अल्पवयीन युवतीशी प्रेमसंबंध जुळले. त्यातूनच दोघे भेटण्यासाठी म्हणून बर्डी परिसरात राहणाऱ्या राहूलच्या मित्राच्या भाड्याच्या खोलीवर गेले होते.आत्महत्येपूर्वी दोघांनीही बिर्याणी खाल्ली. त्यानंतर वेगवेगळ्या दोराने त्याच खोलीत स्वतःला फासावर लटकविले.एकाचा दोर पंख्याला तर एकाचा दोर स्लॅबमधील हुकला बांधलेला होता.यात राहुलचा लगेच मृत्यू झाला.तर प्रेयसीला अर्धवट गळफास लागल्याने ती बेशुद्ध झाली.राहूल फोन उचलत नसल्याने त्याच्या मित्रांनी खोलीवर जाऊन बघितले असता त्यांना धक्काच बसला.तात्काळ दोघांनाही रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र राहूलचा मृत्यू झाला होता तर अल्पवयीन युवतीला पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरीच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र अद्यापही ती बेशुद्ध असल्याने पोलिसांना तिचे बयाण मिळू शकले नाही.त्यामुळे राहुल आणि त्याच्या प्रेयसीने आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला? याचे कारण गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे ज्या दोराने त्यांनी गळफास घेतला तो दोरही त्यांनी आणला होता,यावरून त्यांचा हा निर्णय पूर्वनियोजित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!