Wednesday, August 26, 2026
Homeआरमोरी'जियेंगे तो एकसाथ; मरेंगे तो दोनो साथ' असे करीत  प्रियकरांनी घेतला गळफास..-प्रियकराचा...

‘जियेंगे तो एकसाथ; मरेंगे तो दोनो साथ’ असे करीत  प्रियकरांनी घेतला गळफास..-प्रियकराचा मृत्यू तर प्रेयसी बचावली; आरमोरी शहरातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

आरमोरी(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी शहरात बुधवार दिनांक- १५ मे रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास ‘जियेंगे तो एकसाथ; मरेंगे तो दोनो साथ’ असे प्रियकर व प्रेयसी यांनी आणाभाका घेत दोघांनीही एकाच वेळेस भाड्याच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या नादात प्रियकर याचा मृत्यू झाला तर प्रेयसीचे पाय जमिनीवर लागल्याने प्रेयसी बेशुद्ध होऊन थोडक्यात बचावल्याची घटना काल,गुरुवार दिनांक- १६ मे रोजी  सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्याने सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

प्राप्त माहितीनुसार,प्रियकर राहुल गजानन सावसागडे वय २० वर्षे रा.शिवाजी चौक,आरमोरी व प्रेयसी हे दोघेही आरमोरी तहसील कार्यालयाच्या मागील बर्डी परिसरातील भाड्याच्या खोलीमध्ये १५ मे रोजी एकत्रित आल्याचे कळते.मात्र दोघेही कशासाठी एकत्रित आले हे अजूनपर्यंत कळलेले नाही.त्याच रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास आरमोरी शहरातील परिसरात कुणीतरी दोघेजण गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची कुणकुण सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली.मात्र कुणी गळफास घेतला याची खात्रीशीर माहिती नसल्याने अनेकांनी चुप्पी साधण्याचा प्रयत्न केला.सदर घटनेची माहिती होताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले.घटनास्थळी दोघेही खोलीमध्ये एकाच दोरीने गळफास घेतला असल्याचे दिसून आले.यात प्रियकर याचा मृत्यू झाला तर प्रेयसीचे पाय जमिनीवर लागल्याने प्रेयसी बेशुद्ध होऊन थोडक्यात बचावली.मुलीची प्रकृती खालावल्याने तिला उपचाराकरिता ब्रम्हपुरी येथे हलविण्यात आले.

सध्याच्या घडीला आरमोरी शहर अवैध धंद्याचे माहेर घर झाले आहे.यामध्ये अवैध दारू विक्री,अवैध सट्टा -पट्टी,अवैध तंबाखू विक्री व इतर धंद्यांचा समावेश आहे.यावर अंकुश घालणे आवश्यक आहे.अशातच अनेक ठिकाणी कुठलीही शहानिशा न करता अनेकांना भाड्याने खोली दिली जात असल्याची खमंग चर्चा आरमोरी शहरात दबक्या आवाजात सुरू आहे.प्रियकर व प्रेयसी यांनी एकाच वेळेस गळफास घेतलाच कसा? असा प्रश्न निर्माण झाला असल्याने शंका-कुशंकेला उधाण आले आहे.गळफास घेण्यामागचे कारण अजूनही गुलदस्त्यात असल्याने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून सदर प्रकरणाचा उलगडा लवकरात-लवकर करावा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!