Friday, August 7, 2026
Homeदेसाईगंजहमीभाव धान खरेदी केन्द्र सुरु करा- शेतकरी नेते रामदास मसराम यांची मागणी….

हमीभाव धान खरेदी केन्द्र सुरु करा- शेतकरी नेते रामदास मसराम यांची मागणी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील रब्बी हंगामाची धान मळणी सुरु झाली असुन व्यापारी वर्गांकडून शेतकऱ्यांचे धान कमी भावात खरेदी केल्या जात असल्याने शेतकऱ्यांची सर्रास लुट सुरु आहे.शेतकरी वर्गांची होणारी लुट थांबविण्यासाठी शासनाने तात्काळ हमीभाव धान खरेदी केन्द्र सुरु करावे; अशी मागणी शेतकरी नेते तथा कॉंग्रेसचे कार्यकर्ते रामदास मसराम यांनी केली    देसाईगंज तालुक्यात इटियाडोह प्रकल्पाच्या माध्यमातुन सिंचनाची सोय तसेच मोटार पंपाच्या माध्यमातुन रब्बी धान पिकाची लागवड आरमोरी, कुरखेडा,कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात करण्यात आली.विद्युत पुरवठ्याची सोय व्हावी; यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन थकित बिलाचा भरणा केला. कुरखेडा,कोरची तालुक्यात अपुऱ्या विज पुरवठ्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे धान पिक धोक्यात आले.असे असतांना सद्या धानाची मळणी सुरु होऊनही अद्याप  शासनाने हमीभाव खरेदी केन्द्रे सुरु केली नसल्याने धान्य व्यापारी शेतकऱ्यांचे धान कमी भावाने खरेदी करीत असल्याने शेतकरी वर्गांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट सुरु आहे.शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु केली असली तरी खरीप हंगामाचे खरेदी केलेले धान अद्यापही गोदामातच पडलेले आहे.उचल न झाल्याने नविन खरेदी चा धान साठवायचा कुठे? हा प्रश्न खरेदी केन्द्र संचालकांना पडला असुन ऑनलाईन नोंदणीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही.या समेस्येवर लवकरात-लवकर तोडगा काढुन लवकरात-लवकर हमीभाव धान खरेदी केन्द्रे सुरु करुन देसाईगंज, कुरखेडा,आरमोरी,कोरची या तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थीक लुट थांबवावी; अशी मागणी रामदास मसराम यांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!