Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरआदर्श आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी दोघांना अटक…

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी दोघांना अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका राजकीय पक्षाचा बनावट व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी महिनाभरापूर्वी युवक काँग्रेसचे प्रदेश सहसचिव अमोल मुरलीधर वानखेडे आणि अरुण दिवाकर गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. महिनाभरानंतर नागभीड पोलिसांनी दोघांनाही अटक केली.दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि चिमूर विधानसभा मतदारसंघांचा गडचिरोली लोकसभा मतदारसंघात समावेश करण्यात आला आहे.हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.आदर्श आचारसंहितेच्या वेळी दोन्ही आरोपींनी राजकीय पक्षाच्या संदर्भात आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होता.याबाबत नागभीड येथील बंडू मधुकर गेडाम यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आयपीसी कलम आणि अनुसूचित जाती/जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास ब्रह्मपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला.तपासाअंती दोघांनाही शुक्रवारी अटक करून चंद्रपूर न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!