उद्रेक न्युज वृत्त :- राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ऊन आणि पासाचा खेळ सुरूच आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.तर काही राज्यांमध्ये कडाक्याच्या ऊन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. तर दुसरीकडे तापमान वाढल्यामुळे घामाच्या धारा निघत आहेत.या ऊन-पावासाच्या खेळामुळे नागरिक हैराण झाले आहेत.अशामध्ये आता हवामान खात्याने राज्यात पुढचे ४ दिवस काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस तर काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे.या पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पिक निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.या पावसामुळे शेतपिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले.भाजीपाला,आंबा,संत्रे, कांदा,मका,ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. अशामध्ये सरकारने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तर दुसरीकडे राज्यातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढल आहे.राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. त्याचसोबत नांदेड,पैठण आणि पालघर उष्णाघाताने मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह (३०-४० किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.पुढील चार दिवस या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.

