उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- कशाला पंढरी जाऊन भानगडीत पडतो रे बाबा…तो म्हणतो की,ब्लॅकमेल धंदे पत्रकार करतात; अरे गबाळ्या कितीतरी वेतन शासन स्तरावरून तुला व इतरांना मिळत आहे. अशातच दारू विक्रेते,सट्टा-पट्टी धारक,तंबाखू विक्रेते व इतर माध्यमातून ओव्हर कमाई करून; मिळणारे वेतन जसेच्या तसे व इतर कमाईतून छपाई केंद्र सुरू असून तुझी वा इतरांची तहान भागत नाही कां? हे सर्वांना तसेच पत्रकारांना याची साधी कल्पना नाही काय? मात्र अनेकजण सहकार्याची भावना मनात ठेऊन ‘चलती का नाम गाडी’ असे करीत आहेत. त्यामुळेच अनेकांची पोळी शेकली जात आहे.अशातच फीडबॅक मागविणे ही ‘त्यांची’ कला असल्याचा प्रकार हल्ली निदर्शनास आला आहे.त्यामुळे ‘मैं बडा’ म्हणणे चुकीचे आहे.एकवेळची नोकरी लागणे महत्वाचे तर आहेच; मात्र तिला टिकवणे तितकेच महत्त्वाचे आहे; हेही तितकेच खरे..अन्यथा ‘बँड बाजा बारात अन् तेही दारात’ पोहचल्याशिवय राहणार नाही.

