उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून आता राहुल कुमार (भा.प्र.से.)यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वी श्री अनिमेष कुमार पराशर हे सामान्य निरीक्षक म्हणून जबाबदारी पाहत होते.
निवडणूक निरिक्षक राहुल कुमार सर्किट हाऊस कॉम्पलेक्स येथील मार्कंडा कक्षात मुक्कामी राहणार असून त्यांचा मोबाईल क्रमांक- ९४२००६७६२६ आहे. तसेच कार्यालयीन संपर्क क्रमांक- ०७१३२-२२२०२४ असा आहे.त्यांच्याकडे निवडणूक विषयक कामकाजासंदर्भातील तक्रारी प्रत्यक्ष भेटून सकाळी ११ ते १२ या वेळेत देता येतील किंवा मोबाईलवर संपर्क साधता येईल.
राहुल कुमार आज गडचिरोली येथे रूजू झाले. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.राहुल कुमार यांनी निवडणुक निरीक्षक म्हणुन रुजू होताच आरमोरी विधानसभा मतदारसंघात भेट निवडणूक व्यवस्थेची पाहणी केली.त्यांनी देसाईगंज येथील तहसिल कार्यालयातील सुरक्षा कक्षाची पाहणी करुन स्ट्रॉंग रूमच्या सभोवताची सिसीटीव्ही कॅमेरे,विद्युत व्यवस्था,पोलीस सुरक्षा, अग्निशामक यंत्र,ईव्हीएम साठवणूक कक्ष इत्यादी व्यवस्थेबाबत आढावा घेतले.याप्रसंगी सहायक निवडणूक अधिकारी मानसी तसेच देसाईगंज तहसिलदार प्रिती डुडुलकर,प्रशांत गड्डम तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

