Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीस्कॉर्पिओची दुचाकीला धडक; पोलीस जवान ठार…

स्कॉर्पिओची दुचाकीला धडक; पोलीस जवान ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत

अहेरी(गडचिरोली) :- भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओ वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पोलिस जवान ठार झाल्याची घटना काल, मंगळवारी दिनांक -९ रोजी दुपारच्या सुमारास अहेरी-महागाव मार्गावर घडली.चिन्ना जोगा विडपी वय ४० वर्षे रा.लष्कर ता.भामरागड (ह.मु. अहेरी), असे मृतक पोलिस जवानाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी वाहन चालक स्वप्निल यशंवंत दिवटे वय २९ वर्षे रा. वाकडी (ह.मु.डोंगरगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे.चिन्ना विडपी हे सी-६० जवानांचे माजी कमांडर असू न सद्यस्थितीत अहेरी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.दरम्यान ते आपल्या दुचाकीने अहेरी येथून वांगेपल्लीकडे जात होते.दरम्यान अहेरी-महागाव मार्गावर एम.एच.३२ एएच ४०५३ क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनाने भरधाव वेगात येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.यात त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती प्राप्त होताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला.त्यांची पत्नी यांच्या तक्रारीवरुन आरोपी चारचाकी वाहन चालक स्वप्निल दिवटे याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जनार्धन काळे यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!