उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- विज्ञानयुगात मोबाइल क्रांती झाल्यापासून तरुण-तरुणींच्या प्रेम प्रकरणाच्या घटना वाढीस लागल्या आहेत. व्हॉटसॲप,फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया ॲपमुळे तरुणाई पार लयाला गेली आहे.आजघडीला ती स्वप्नाळू दुनियेत जगताना दिसत आहेत.अशीच एक घटना लाखनी तालुक्यात मजनूच्या बाबतीत घडलेली आहे.
पोलिस सूत्रानुसार, लाखनी तालुक्यातील चान्ना (धानला) या गावातील युवती शेतातील काम करण्यासाठी शेताकडे जात असताना गावातीलच मजनू युवक होमदेव भागवत बांते वय २६ वर्षे हा आपल्या मोटारसायकलने गावालगतच्या नहराजवळ आला व त्या युवतीला मला तू खूप आवडतेस असे म्हणून तिला ‘आय लव्ह यू’ म्हणत प्रपोज केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे युवती शरमल्यासारखी झाली.विनयभंग झाल्याचे तिला जाणवले.
या प्रकाराची माहिती तिने लाखनी पोलिस स्टेशनला दिली व मजनू तरुणाच्या विरोधात तक्रार दाखल केली.फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात कलम ३५४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

