Tuesday, July 28, 2026
Homeदेसाईगंजजंगली हत्तींचा कळप ऊसेगांव,कोंढाळा जंगल परिसरात दाखल…-वन विभाग देसाईगंज(वडसा) तर्फे नागरिकांनी सतर्कता...

जंगली हत्तींचा कळप ऊसेगांव,कोंढाळा जंगल परिसरात दाखल…-वन विभाग देसाईगंज(वडसा) तर्फे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- जंगलीहत्तींचा कळप देसाईगंज तालुक्याच्या ऊसेगांव जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास दाखल झाला असून कोंढाळा जंगल परिसरात जंगली हत्तींचा कळप दाखल होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने शेतकरी बांधव तसेच सरपण गोळा करणाऱ्या महिला वर्ग त्याचप्रमाणे शेत बांधावर रोवणी करणाऱ्या महिला वर्गांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वन विभाग देसाईगंज(वडसा) तर्फे आज,सोमवार दिनांक- १२ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास कोंढाळा गावातील लाऊड स्पीकरच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

जंगली(रानटी) हत्तींच्या तावडीत जो सापडला तो संपला असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा,आरमोरी तसेच देसाईगंज तालुक्यात यापूर्वी तसेच हल्ली जंगली हत्तींनी धुमाकूळ घालून काही नागरिकांचा बळी घेण्यासोबतच शेत पिकांची नासधूस व अनेकांची घरे उद्ध्वस्त करून आपले अधिराज्य गाजविले आहे. अशातच वन विभागातील अधिकारी,कर्मचारी जंगली हत्तींवर पाळत ठेऊन कितीही बचाव कार्य राबवित असले तरीही सुध्दा त्यांच्या पदरी अपयश येऊन; सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी होतांना दिसून येत आहे.एखादा इसम वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाल्यास केवळ सांत्वन तसेच गोर-गरीब जनतेसाठी असणारी भली मोठी रक्कम अदा करण्यात येते.मात्र जिवाचे काय?तुम्ही पंख्यात बसून हवा खाताय अन् आम्ही जीवाचे रान करून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मरतोय त्याचे काय? असे जनतेमधून सुर निघू लागले असल्याने यावर कुठेतरी आळा घातला जावा; अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.तुम्ही कितीही ओरडा वा काहीही म्हणा आम्ही लक्ष घालणार नसल्याची जणूकाही शपथ वन विभागाने घेतली की काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून सोडत आहे.मात्र याचे कुणाला कसलेही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे.मानवा पेक्षा यांचा वन्य प्राणी महत्वाचे असल्याने सदर यंत्रणा बचाव कार्यात कुचकामी झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.यावर कुठेतरी आळा घालून आपलीच पोळी शेकण्याचे काम बंद करावे; अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!