उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली) :- शेतीकाम करण्यास जात असलेले ट्रॅक्टर शेतातील चिखलात फसल्याने ते काढण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर उलटला गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव शेतशिवारात घडली.सुरेश दुधराम लट्ठे वय ५० वर्षे रा.ठाणेगाव, असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक रमेश लट्ठे हा दुपारच्या सुमारास ठाणेगाव येथील शेतशिवारातील शेतीकाम करण्यासाठी जात होता.दरम्यान ऋषिजी नैताम यांच्या शेतातच अचानक शेतातील खोल चिखलात ट्रॅक्टर फसल्या गेले.फसलेला ट्रॅक्टर चिखलातून बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरच्या चाकात लाकडी बल्ली टाकून काढण्याचा प्रयत्न केला.मात्र याचवेळी ट्रॅक्टवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर अचानक उलटले.यात ट्रॅक्टरखाली चिखलात चालक दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर याबाबतची माहिती आरमोरी पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रॅक्टरखाली दबलेला मृत्यदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढला.पुढील तपास आरमोरी पोलिस करीत आहेत.

