Monday, August 10, 2026
Homeदेसाईगंजजंगली हत्तींचा कळप देसाईगंज वनपरिक्षेत्रातील जंगलात-शेतकऱ्यांच्या पिकांचे केले नुकसान

जंगली हत्तींचा कळप देसाईगंज वनपरिक्षेत्रातील जंगलात-शेतकऱ्यांच्या पिकांचे केले नुकसान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली):-ओडिशा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेला जंगली हत्तींचा कळप देसाईगंज वनपरिक्षेत्रातील जंगलात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे.दरम्यान, हत्तींकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे सातत्याने नुकसान होत आहे. रविवारी रात्री या कळपातील दोन हत्ती भरकटल्याने त्या हत्तींनी चिखली गाव परिसरातील भात पिकांचे अतोनात नुकसान केले.सोमवारी सकाळी दोन हत्ती दिसल्याने चिखलीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या संदर्भातील माहितीनुसार या रानटी हत्तींच्या कळपातील हत्तींची संख्या २३ च्या आसपास आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कळप देसाईगंज वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विहीरगाव उपविभागाच्या जंगलात आहे.रविवारी रात्री कळपातील दोन हत्ती वेगळे होऊन चिखली गावातील शेताच्या आवारात पोहोचले.जिथे दोन्ही हत्तींनी रब्बी धान पिकाचे अतोनात नुकसान केले.सध्या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भात पिकांची पेरणी केली आहे.येत्या काही दिवसांत रोवणीच्या कामाला सरुवात होणार आहे.मात्र अशा परिस्थितीत जंगली हत्तींकडून पिकांचे नुकसान होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.सोमवारी सकाळी वनविभागाच्या पथकाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचून पंचनामा केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!