Thursday, July 16, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा संपन्न….

देसाईगंज औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा संपन्न….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणासोबत टिमवर्क,स्ट्रेस,टाईम मॅनेजमेंट व प्रशींक्षनार्थ्यांच्या सुप्त कला गुणांचा विकास व्हावा; यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे संस्थेचे प्राचार्य एस.एस.चौधरी व कार्यक्रम समन्वयक आर.एम.गोतमारे गटनिर्देशक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक- २० जानेवारी ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये  क्रिकेट, व्हॉलीबॉल,बॅडमिंटन,बुद्धिबळ,१०० मीटर रनिंग, बोरादौड,तीनपाय दौड,रांगोळी स्पर्धा व दिनांक – २४ जानेवारीला १)श्रीरामप्रभू, २)जी-२०,३)आजादी का अमृत महोत्सव,४)कौशल्य भारत कुशल भारत या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.दिनांक – २५ जानेवारी ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दिनांक- २६ जानेवारी ला ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे प्राचार्य एस.एस.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे आफताब आलाम खान(आयएमसी) चेअरमन,आर.एम गोतमारे गटनिदेशक,जाधव मैडम,मुख्यलिपीक गूनेश्र्वर वांढरे  यांच्या हस्ते सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.२०२३-२४ चा उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी प्रणय व्ही.राऊत जोडारी व्यवसाय प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात आली. वसतिगृह उत्कुष्ट प्रशीक्षनार्थी म्हणून उमेश डी.जांभुळे याची निवड करण्यात आली.क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांना चषक,प्रशस्तीपत्र व रांगोळी स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांना सी.एम.गरमळे यांच्याकडून रोख बक्षीस देण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.एम.गरमळे NSS समन्वयक व आभार प्रदर्शन व्ही.वाय नागमोती NSS सहसमन्वयक यांनी केले.क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमानुसार समिती स्थापन करण्यात आली.श्रीमती एम.एस.जाधव,ए.व्ही.भोले, सी.डी.समर्थ,के.एस.ऊमक,आर.बी.भोयर,बी.बी.घरडे ,बोकडे सर,टी.यू.सोयाम,कु.के.पी.बोन्द्रे,एम. वाय.कापगते, एस.एन.पठाण,एच.के.मरसकोले,एस. एस.पिलारे,एस.पी.मेश्राम, जी.जे.ठाकरे, ए.टी.कोरणकर,एस.डी.पत्रे व्ही.ओ.मेश्राम,श्रीकृष्ण करांकर सदर निदेशक व श्रीमती शोभा धोटे,एम. एस.ठाकरे, सी.डी.दलाल,एस.एम नीकुरे व सर्व कर्मचारीवृंद व प्रशिक्षनार्थ्यांनी दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!