उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- मला आत्ताच दारू दे, अन्यथा तुला झोडपतो,असे म्हणत गालावर मारले.ही घटना तालुक्यातील डांगोर्ली येथे सहा दिवसांपूर्वी रात्री 8 वाजता घडली.तक्रारीवरून आरोपी मदन रंगलाल पाचे (वय ४०) याच्याविरोधात रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.तालुक्यातील डांगोर्ली येथील गजानन अनंतराम मेश्राम (वय ४१) हे मंगळवारी रात्री ८ वाजता आपल्या घरी पत्नी, मुलाबाळांसह जेवण करीत होते.या दरम्यान गावातील आरोपी मदन रंगलाल पाचे तिथे आला व दारूची मागणी केली. यावर गजानन मेश्रामने माझ्याकडे दारू नाही,असे म्हटले.यावरून आरोपी मदनने गजानन मेश्राम यांच्या घरातील साहित्य फेकून आरडाओरड केली.दारू देत नसल्याच्या कारणावरून गजानन मेश्रामच्या गालावर मारले.तसेच शिवीगाळ करीत तुम्हाला ठार मारतो, अशी धमकी दिली.याप्रकरणी गजानन मेश्राम यांनी आरोपी मदन पाचे विरोधात रावणवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली.त्यावरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हवालदार बघेले करीत आहे.

