Tuesday, September 1, 2026
Homeचंद्रपूरनागभीड येथे कुष्ठांतेय सक्षमीकरण दिन उत्साहात साजरा….

नागभीड येथे कुष्ठांतेय सक्षमीकरण दिन उत्साहात साजरा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-  सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था,नागभिडच्या वतीने गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासह दिनांक- ५ डिसेंबर हा कुष्ठांतेय सक्षमीकरण दिन आणि वार्षिक स्नेहमिलन व संवाद समारंभ नागभीड येथे उत्साहात साजरा करण्यात आला.कुष्ठांतेय सक्षमीकरण दिनाचे औचित्याने  कुष्ठांतेयाच्या समस्या सोडविण्यासाठी समस्या निवारण केंद्राचे उदघाटन करण्यात आले.सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या आर्थिक मदतीने ज्या कुष्ठांतेयांनी आपले व्यवसाय सुरु करून यशस्वीपणे  वाटचाल केली; अशा कुष्ठांतेयाचे सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या वतीने शिल्ड,श्रीफळ व पुष्पगुच्च देऊन सत्कार करण्यात आले.तसेच नंदुरबार या कुष्ठबहुल आदिवासी जिल्ह्यात २०२३ मध्ये कुष्ठांतेयांना संघटीत करून स्थापन  झालेल्या नंदुरबार जिल्हा कुष्ठांतेय फोरमला सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेची नंदुरबार जिल्हा शाखा म्हणून मान्यता देण्यात आली.नंदुरबार जिल्हा शाखेचे प्रतिनिधी सदर कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष उमाकांत शेंडे,प्रमुख पाहुणे तारकल बांबोळे, मिलिंद बारसिंगे,मोतीराम चौधरी,अलर्ट इंडिया चे प्रकल्प समन्वयक अभिजीत कांबळे, गुरुदेव भुरसे, नंदुरबार शाखेचे अध्यक्ष खंडेराव चित्ते,कोषाध्यक्ष योगेश साबळे,कुष्टांतेय अधिकार मंच च्या सदस्या वनिता बोरकर,संस्थेचे मार्गदर्शक आशुतोष प्रभावळकर,संस्थेचे कार्यकारी संचालक गुणवंत वैद्य यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील संस्थेचे आजीवन सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित पाहुण्यांचे समयोचित मार्गदर्शन झाले.कार्यक्रमाचे  प्रास्ताविक करतांना अश्विनी नन्नावरे यांनी सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेने केलेल्या यशस्वी कार्याची यशोगाथा प्रस्तुत केली. कार्यक्रमाचे संपूर्ण संचालन विद्यानंद दांडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिमा चौधरी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रावण हांडेकर,मिलिंद बारशिंगे,नारायण उरकुडे,विद्या कांबळी,विनोद डोंगरवार,संदीप माटे,शरद निकुरे  व सर्व समाज प्रवर्तक आणि संस्थेच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!