Monday, September 21, 2026
Homeकोंढाळादुखःद बातमी; २८ वर्षीय तरुणाचा सर्प दंशाने मृत्यु…कोंढाळा येथील तरुण; संपूर्ण गावात...

दुखःद बातमी; २८ वर्षीय तरुणाचा सर्प दंशाने मृत्यु…कोंढाळा येथील तरुण; संपूर्ण गावात हळहळ व्यक्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके 

 कोंढाळा(देसाईगंज):- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील सुशिक्षित,होतकरू,मन मिळावू व सर्वांना आपले समजून साजेसे करणारे व्यक्तिमत्त्व असणारा २८ वर्षीय तरुण अशोक मनोहर लेनगुरे याचा रात्री झोपेत असतांना सर्प दंश होऊन मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक-११ नोव्हेंबर रोजी पहाटे उघडकीस आली आहे.

कोंढाळा येथील २८ वर्षीय तरुण अशोक लेनगुरे काल दिनांक-१० नोव्हेंबर रोजी रात्रो अंदाजे ११ ते १२ वाजेच्या सुमारास कोंढाळा गावापासून १ किलोमीटर अंतरावरील लहरी कारखान्यात रात्र पाळीत काम करीत असतांना झोपेत गेला; मात्र अचानकपणे झोपेत असतांना हाताच्या बोटांना काहीतरी दंश केला असल्याची त्याला जाणीव झाली.दंश झाल्याची जाणीव होताच; अशोक ची भंबेरी उडाली.त्यामुळे सोबत असलेला व्यक्ती पटकन झोपेतून जागा झाला.त्यानुसार सोबतीला असलेल्या व्यक्तीने इकडे-तिकडे बघून रात्र किडा वा सरपटणाऱ्या प्राणी यांच्याकडे लक्ष केंद्रित केले.लक्ष केंद्रित केले असता,कारखान्याच्या खोलीतच सोबत्याला साप दिसला.त्यानंतर लगेच सोबत असलेल्या व्यक्तीने प्रसंगावधान साधून घडलेल्या घटनेची गावात माहिती दिली.माहिती कळताच लगेच कुटुंबीय व गावातील ग्रामस्थांनी धाव घेऊन अशोक ला रात्री २ वाजेच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय आरमोरी याठिकाणी भरती करण्यात आले.मात्र काही कारणास्तव अशोक ला जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.गडचिरोली येथे उपचार सुरू असतांना काही कालांतराने अशोक ची प्रकृती बिघडू लागली.अशातच प्रकृती खालावल्याने अखेर आज पहाटेच्या सुमारास अशोक ची प्राणज्योत मावळली.

अशोक मोल मोजुरी करून कुटूंबीयांस हातभार लावण्यासाठी मदत करीत होता व जमेल ते काम करायचा; गावात होतकरू,मन मिळावू व सर्वांना आपले समजून साजेसे करणारे व्यक्तिमत्त्व असणारा २८ वर्षीय तरुण अशोक लेनगुरे सर्प दंशाने मृत पावल्या प्रकरणी गावामध्ये हळहळ व्यक्त केले जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!