Thursday, June 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तगडचिरोली करणार महाराष्ट्राचे नेतृत्व…सुरज चौधरी यांची पंतप्रधान पदी तर प्रियंका ठाकरे यांची...

गडचिरोली करणार महाराष्ट्राचे नेतृत्व…सुरज चौधरी यांची पंतप्रधान पदी तर प्रियंका ठाकरे यांची महिला व बालकल्याण पदावर निवड….- मुंबईच्या युवा संसदेत करणार संपुर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र,महाराष्ट्र व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा संसद- २०२३ ची ४ नोव्हेंबर २०२३ रोजी निवडणूक झाली असून दिनांक ७ नोव्हेंबर ला निवडणुकीचा निकाल लागला.त्यात महाराष्ट्रातील तमाम युवांनी गडचिरोली जिल्ह्यातील सुरज चौधरी यांना पंतप्रधान  आणि प्रियंका ठाकरे यांना महिला व बालकल्याण पदाकरीता प्रचंड मतांनी विजयी केले आहे.दोन्ही उमेदवार गडचिरोली जिल्ह्यातील नेतृत्व करणारे असुन गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत आहेत.सुरज चौधरी यांनी निपुण भारत या भारत सरकार च्या शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात प्रथम संस्थेच्या वतीने जिल्हा समन्वयक म्हणून काम केले असून प्रियंका ठाकरे ह्या उत्कृष्ट निवेदक आणि रिपोर्टर म्हणून कार्यरत आहेत.या सोबतच दोन्ही तरूण जिल्ह्याच्या सामाजिक शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने समाजप्रबोधनाचे काम व समाजात शैक्षणिक जनजागृती करीत आहेत.सामाजिक कार्य करत अगदी स्थानिक पातळीपासून राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत ह्यांनी नेतृत्व केले असून अनेक ‌पुरस्कारांवर नाव कोरले आहे.निवडणूकीत सुद्धा दोघांनी बाजी मारली असून १९ आणि २० नोव्हेंबर २०२३ ला ते गडचिरोली सोबतच महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत.

त्यांनी आपल्या यशाचे श्रेय नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी पुंडे,मार्गदर्शक मीत्र नितीन गायकवाड, ओमकार पाटिल गणेश माळी,सौरभ वाघमारे,तुषार माने,सुनील वाघमारे,स्वप्निल दळवी,तृप्ती मोकळं, कोमल दुर्गुडे,सलमान खान,प्रियंका गायकवाड,तेजस दोनाडकर प्रशांत खांडवे, तुकाराम माळी, तसेच महाराष्ट्रातील सर्व मित्र परिवार व आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण युवावर्ग आणि आपल्या गावाला दिले आहे.दोघांच्या ही विजयाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे…

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!