Monday, September 7, 2026
Homeगोंदियानकली पोलीस बनून फसवणूक करणाऱ्या दोघांना गडचिरोली,चंद्रपुरातुन अटक

नकली पोलीस बनून फसवणूक करणाऱ्या दोघांना गडचिरोली,चंद्रपुरातुन अटक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गोंदिया :- तुमच्या हॉटेलात एका मुलीचा अश्लील व्हिडीओ तयार केला असून गुन्ह्याच्या चार्जशीटमधून नाव कमी करण्यासाठी ६० हजार रुपयांची मागणी केली होती.घाबरून हॉटेल मालकाने ६० हजार रुपये फोन पेवरून दिले.त्याची तक्रार पोलिसांत केली.पोलिसांनी दोघांना चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून अटक केली.चंदन दिगुराम सांगरे वय २८ वर्षे,रा.आष्टी जि. गडचिरोली आणि रवी मारोती मंचावार वय ५३ वर्षे, रा.दाताडा रोड,चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत.

शहरातील गांधी चौक परिसरातील हॉटेल राइस सिटीचे मालक गोपाल प्रल्हादराय अग्रवाल यांना अज्ञात व्यक्तीने ४ नोव्हेंबर रोजी फोन केला. तुमच्या हॉटेलमध्ये एका मुलीचा अश्लील व्हिडीयो तयार केला असून त्यात तुमचे नाव येत असल्याची भीती दाखविली.गुन्ह्याच्या चार्जशीटमधून त्यांचे नाव कमी करण्यासाठी पोलिस प्रोसेक्युटरला देण्याकरिता ६० हजार रुपये पाठवा,असे सांगितले.गोपाल अग्रवाल यांनी घाबरून गुन्हा दाखल नसताना सुद्धा अनोळखी व्यक्तीच्या मोबाइलवर ६० हजार रुपये पाठविले.यासंदर्भात गोपाल अग्रवाल यांनी ६ नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गोंदियाचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी तपास सुरू केला.ज्या खात्यात पैसे टाकण्यात आले त्यावरून तपशील गोळा करण्यात आला.पथकांना गडचिरोली आणि चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले.आरोपी चंदन दिगुराम सांगरे रा. जयगुरूनगर,आष्टी,ता.चामोर्शी,जि.गडचिरोली आणि रवी मारोती मंचावार,रा.दाताडारोड,चंद्रपूर या दोघांना अटक केली.इतर जिल्ह्यातदेखील आपण हॉटेल चालकांची फसवणूक केल्याची कबुली आरोपींनी दिली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!