Wednesday, August 26, 2026
Homeआरमोरीमोठी बातमी; धान कापणी करणाऱ्या महिलेच्या नरडीचा वाघाने घेतला घोट….-आरमोरी तालुक्यातील आजची...

मोठी बातमी; धान कापणी करणाऱ्या महिलेच्या नरडीचा वाघाने घेतला घोट….-आरमोरी तालुक्यातील आजची घटना….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

आरमोरी(गडचिरोली) :- सध्याच्या घडीला गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात धान कापणीला सुरुवात झाली आहे.त्यानुसार शेतकरी बांधव शेतातील पाणी निचरा वा झालेले धान कापणी करीता महिला वर्गांना पाचारण करून शेतातील कामे पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत.अशातच देसाईगंज व आरमोरी तालुक्यात हिंस्त्र प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे.एक दिवसा आड वन्य प्राणी व मानवी संघर्ष होतांना दिसून येत आहेत.असाच प्रकार आज दिनांक – १९ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे.आरमोरी तालुका मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या रामाळा गावात; काळागोटा येथील सात ते आठ महिला आज शेतात धान कापणी करीत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे शेतात काम करीत असलेल्या महिलांवर हल्ला चढविला; सदर वाघाने चढविलेल्या हल्ल्यात आरमोरी तालुक्याच्या काळागोटा येथील महिला ताराबाई एकनाथ ढोडरे  अंदाजे वय ६० वर्षे यांना वाघाने काही अंतरावर दूर फरफटत नेऊन नरडीचा घोट घेतला; सहकारी महिलांनी आरडा-ओरड करून महिलेची सुटका तर केली; मात्र ताराबाई यांची प्राणज्योत मावळली.सदर घटनेची माहिती मिळताच आरमोरी वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम व विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन सदर घटनेचा पंचनामा केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!