Thursday, April 30, 2026
Homeआरमोरीअन् शेतकरी निसटला वाघाच्या तावडीतून….-आरमोरी तालुक्यातील चित्त थरारक घटना..

अन् शेतकरी निसटला वाघाच्या तावडीतून….-आरमोरी तालुक्यातील चित्त थरारक घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

आरमोरी :- तालुक्याच्या वैरागड जंगल परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचा धुमाकूळ सुरु आहे.दररोज नागरिकांना आवागमन करताना वाघाचे दर्शन होत आहे.दरम्यान,मंगळवारला वाघाने शेतक-याच्या अंगावर उडी घेतली.मात्र प्रसंगावधान राखून त्याने झाडाची फांदी हाती घेऊन आपला जीव वाचविल्याची थरारक घटना वैरागड नजीकच्या सोनपूर येथे घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.प्राप्त माहितीनुसार, मंगळवारला वैरागड येथून जवळच असलेल्या सोनपूर येथील शेतकरी रमेश डोंगरवार हे चामोर्शी चक येथील आपल्या शेतात गेले होते.तेथून परत येत असताना सायकल वरून लघुशंकेसाठी ते खाली उतरले. यादरम्यान, जंगली झुडूपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.त्यामुळे त्यांची भंबेरी उडाली.त्यांनी जवळच असलेल्या एका झाडाची डहाळी उचलली असता,वाघ थोडा बाजुला गेला.वाघ दूर जाताच संधी साधून त्यांनी तिथून पळ काढला असता; ते खड्ड्यात पडले. त्यामुळे ते जखमी झाले.कसेबसे स्वतःला सावरत त्यांनी गाव गाठले.घडलेला प्रसंग गावकऱ्यांना सांगितला.त्यांच्या कमरेला दुखापत झाल्याने नागरिकांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वैरागड येथे उपचाराकरीता भरती केले.हल्ली वाघ,वाघीण यांच्या हल्ल्याच्या घटना देसाईगंज तसेच आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घडीत असल्याचा प्रकार निदर्शनास येऊ लागला आहे.त्यामुळे वन्य जीव व मानवी संघर्ष टाळण्याकरिता त्वरित उपाययोजना वन विभागाने करण्यात यावी; अशी मागणी शेतकरी बांधव व सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!