Tuesday, May 26, 2026
Homeदेसाईगंजशेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान करून ओसरला पाणी....-कोंढाळा गावातील शेतकरी चिंताग्रस्त…

शेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान करून ओसरला पाणी….-कोंढाळा गावातील शेतकरी चिंताग्रस्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- यंदाच्या परिस्थितीत शेतकरी बांधव शेतातील धान पिकांच्या बाबतीत मोठ्या आशेवर होते.धान पीक पाहून अमुक व्यक्तीला एवढे धान होणार; तमुक व्यक्तीला तेवढे धान होणार; मात्र कृत्रिमरीत्या आलेल्या पुराने शेतकरी बांधवांच्या सर्व आशेवर पाणी फेरले आहे.कारण की साहेब वा मॅडम येतो व वर-वर पाहून निघून जातो.त्यांना ‘ना सुतक ना बारसा ‘असे असल्याने कोंढाळा गावातील शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.

गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने धरण सुरक्षेच्या दृष्टीने व धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता धरणातून आवश्यकतेनुसार टप्प्या-टप्प्याने १५ सप्टेंबर व १६ सप्टेंबर २०२३ रोजी धरणाचे पाणी सोडण्यात आले होते.त्यानुसार विविध नदी नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली व अनेक रस्ते बंद झाली होती. अशातच देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावापासून तीन किलोमटरवर अंतरावर पश्चिमेस असलेल्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने गावातील शेतकरी बांधवांची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी बांधवांवर मोठे संकट ओढवले होते.

कोंढाळा गावातील शेतकरी बांधवांच्या जवळपास शेकडो हेक्टर शेती पुरबाधित झाल्याने उभे असलेले शेतातील संपूर्ण धानपिक जरी नष्ट झाले नसले तरी गर्भाशयात आलेल्या धान पिकावर पुराच्या पाण्याचा मारा झाल्याने येणारे धानाचे लोंब काळपट व पांढरे येणार असल्याचे गावातील शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे.त्यानुसार येणाऱ्या धानाला कवडीमोल भाव मिळणार असल्याने शेतीचे पंचनामे होणार की नाही? तसेच नुकसान भरपाई मिळणार की नाही? अशी चिंता गावातील शेतकरी बांधवांना भेडसावत आहे. अशातच ‘शेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान करून ओसरला पाणी’ व साहेब म्हणतो आम्ही आता गाणार गाणी’ असे होऊन चालणार नाही तर नुकसाभरपाई देण्यात यावी; अशी मागणी शेतकरी बांधवांकडून जोर धरू लागली आहे.

.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!