Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीलग्नासाठी मुली मिळेना...! वंशाचा दिवाच हवा; कधी  मानसिकता बदलणार?

लग्नासाठी मुली मिळेना…! वंशाचा दिवाच हवा; कधी  मानसिकता बदलणार?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- ‘ मुला पेक्षा मुलगी बरी प्रकाश देतोय दोन्ही घरी’..! असे म्हटले जात असेल तरीही आजच्या घडीला मुलगा हा वंशाचा दिवा आहे असा गैरसमज समाजात आजही आहे.मुलीला दुय्यम स्थान देण्याची गोष्ट केली जाते.मुलगा-मुलगी दोघे समान ही धारणा समाजात रुजू होणे आवश्यक आहे.ही मानसिकता ठेवणाऱ्यांवर कायद्याचा वचक असतोच.मात्र मुलींची संख्या कमी असल्याने मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे दिसते.तसेच ज्या मुली आहेत त्यांच्या अपेक्षाही मोठ्या आहेत.शासकीय नोकरदार, उद्योजक अशीच मागणी असल्याने सामान्य आणि बेरोजगार असलेल्या मुलांना लग्नासाठी मुली मिळेना झाले आहे.मुलांची दिवसेंदिवस वय वाढतच चालली आहे. अशातच मुलींच्या अपेक्षेत वाढ झाली आहे.

सुशिक्षित बेरोजगारांची संख्या शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही वाढत चालली आहे.ग्रामीण भागातील मुलीही आता शासकीय नोकरी वाल्यांना पसंती देत आहेत.काही भागात तर सुशिक्षित मुले वय होवूनही अविवाहीत आहेत.शासकीय नोकरी नसल्याने अनेकांचा पत्ताच कट केला जातो आहे.शेती असून शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे.

मुलीचीच नव्हे तर वधूपित्याची पहिली पसंती शासकीय नोकरीतील मुलांनाच अधिक आहे.त्या खालोखाल खाजगी नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या मुलांना अधिक पसंती दिली जाते.मात्र शेतकरी आणि ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना मात्र मुलगी मिळणे आधुनिक युगात कठीण झाले आहे.काही तरूण बिना हुंड्याने विवाह करायला तयार आहेत.परंतू वधूपिता मुलगी द्यायला तयार नाही.पूर्वीच्या काळात हुंडा व मुलगी अनेकांना मिळत होती.परंतू आधुनिक काळात त्यात बदल झाला आहे. त्यामुळेच वधूपिता आपली मुलगी सुखाने राहावी, यासाठी शासकीय नोकरीवर असलेला जावई शोधत आहेत.गावागावातच आता वरासाठी वधू शोधन्याचे काम सुरू आहे.परंतू जो-तो वधूपिता शासकीय नोकरी असणाऱ्यांनाच प्राधान्य देत आहे. शेतकऱ्याच्या मुलाचा भाव लग्नाच्या बाजारात घसरलेला आहे.चार ते दहा एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळणे कठीण जात आहे.एव्हढेच नव्हे तर मामा सुद्धा शेतकरी असलेल्या भाच्याला मुलगी देणे नापसंत करीत आहेत.त्यामुळे लग्नाळू मुलांना मुली मिळणे कठीण जात आहे.त्यामुळे वंशाचा दिवाच हवा ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.अन्यथा लग्नासाठी ‘कुणी मुली देता कां? मुली’….असे झाल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!