Tuesday, July 28, 2026
Homeकुरखेडाअवैध रेतीचा उपसा प्रकरणी कुरखेडा तहसिलदारांची धडक कारवाई....- रेतीचे दोन ट्रॅक्टर जप्ती...

अवैध रेतीचा उपसा प्रकरणी कुरखेडा तहसिलदारांची धडक कारवाई….- रेतीचे दोन ट्रॅक्टर जप्ती तर एका ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून केला पोबारा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

कुरखेडा(गडचिरोली) :- कुरखेडा तालुक्यात अवैधरीत्या शासनाच्या गौण खनिजांची तस्करी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच चालली होती.तस्करी करणाऱ्यांवर पाहिजे त्या प्रमाणात कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने अवैध रेती,मुरूम,माती व इतर गौण खनिजांचे उत्खनन करून ‘माल सुतावो’ अशी भूमिका चोरट्यांकडून केली जात होती. अशातच कुरखेडा तहसील कार्यालयाचे नवनियुक्त तहसिलदार  राजकुमार धनबाते यांनी अवैध तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा सपाटा चालविण्यास सुरुवात केल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला येथील काल शनिवारी रात्रीच्या सुमारास सती नदी पात्रात अवैध रेती भरले ट्रॅक्टर घाटातून निघत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार व नियोजित भरारी पथक यांना मिळताच; सदर घटनास्थळ गाठून पथकाने पाठलाग करीत तहसील कार्यालयासमोर ट्रॅक्टर क्रमांक-एम. एच.३४ ए पी ३११२ वाहनास रेतिसह पकडले.

त्या नंतर लगेच सती नदी येथील रेती भरत असलेले दोन ट्रॅक्टर घटनास्थळी पकडले.सती नदीत ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३३ एफ ४८११ व एम.एच. ३३ वी ३२३७ असे दोन्ही ट्रॅक्टर भरारी पथकाच्या हाती लागले.पकडले ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करणे करिता नेत असतांना ट्रॅक्टर क्रमांक – एम.एच. ३३ वी ३२३७ घेवून पसार झाला.सदर घटनेमुळे सुरक्षेच्या दृष्टीने पकडलेले दोन्ही ट्रॅक्टर कुरखेडा पोलिस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आले आहेत.प्राप्त माहितीनुसार कुरखेडा येथील तुषार कुथे,तळेगाव येथील सचिन सहारे व मालदुगी येथील महेंद्र सहारे यांचे मालकीचे ट्रॅक्टर असल्याने त्यांच्या वरती महसूल विभागाचे गौण खनिज कायद्या अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!