Sunday, May 24, 2026
Homeचंद्रपूरशेतकरी बांधवांना त्वरित पिक कर्ज वाटप करण्यात यावे- राकाँचे ज्येष्ठ नेते आबीद...

शेतकरी बांधवांना त्वरित पिक कर्ज वाटप करण्यात यावे- राकाँचे ज्येष्ठ नेते आबीद अली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नितेश केराम/कोरपना ता.प्र.

कोरपना :- शेतकरी बांधवांच्या अडचणी व समस्या लक्षात घेता आगामी हंगामासाठी राष्ट्रीयकृत व सहकारी पिक कर्ज वाटप कार्यक्रम त्वरित घेण्यात यावा; अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते आबीद अली व शेतकरी बांधवांनी केली आहे.

शेतकऱ्यांचा यंदाचा हंगाम मार्च ते एप्रिल पासून संपला आहे.पुढील हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बांधव पुढे सरसावला आहे नांगरनी,वखरनी,बियाणे खरेदी व शेत मजुरांना मजुरी अदा करण्यासाठी शेकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे.यंदाच्या हंगामात कापसाला अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकरी वर्ग चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.कशी-बशी बसे जुडवा- जुडव करून मार्च महिन्यात आपले मागील वर्षाचे पिक कर्ज भरले आहेत.त्यामुळे त्यांच्याकडे आता दमडी सुद्धा उरली नाही.सोयाबीन, तूर,हरभरा व इतर शेत माल विक्रीतही शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी आर्थिक अडचणींचा सामना व शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त होऊन कसे-बसे उदरनिर्वाह करून जीवन जगीत आहेत.तसेच विवाह सोहळे,बोरवण कौटुंबिक  कार्यक्रम आगामी काळात येऊन ठेपले आहेत.अशा परिस्थित शेतकऱ्यांनी काय करावे?अशी स्थिती निर्माण झाली आहे.बरेच शेतकरी बांधव यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत.त्यामुळे शासनाने शेतकरी बांधवांच्या अडचणी व समस्या लक्षात घेता राष्ट्रीयकृत बँकांनी पिक कर्ज त्वरित देण्यासाठी निर्देश द्यावे व शेतकरी बांधवांच्या अडचणी दूर करावीत अशी मागणी राकाँचे ज्येष्ठ नेते आबीद अली व शेतकरी बांधवांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!