- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-एका अज्ञात तरुणाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ११ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास देसाईगंज शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या गोंदिया मार्गे तुकुम परिसरातील रेल्वे रुळावर उघडकीस आली.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आज सकाळच्या सुमारास शहरातील काही नागरिकांना एक अज्ञात इसम देसाईगंज-गोंदिया मार्गावरील रेल्वे रुळावर पडून असल्याचा दिसून आला.काहींनी जवळ जाऊन पाहिले असता शरीराचा अर्धा भाग दुसरीकडे,तर अर्धा भाग रेल्वे रुळावर असल्याचे निदर्शनास आले.दरम्यान, घटनेची माहिती तात्काळ देसाईगंज रेल्वे प्रशासनास देण्यात आली. रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला व पुढील तपास सुरू केला आहे. मृतक तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून कुणाच्या ओळखीचा असल्यास देसाईगंज पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

