- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-गुन्ह्यात तडजोड करून प्रकरण मिटवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपाई यांच्याविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात अप.क्रमांक-२०३९/२०२६ कलम ७,१२भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम,१९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवार ३० सप्टेंबर रोजी उशिरा ही कारवाई करण्यात आली.दरम्यान,नियोजित सापळा कारवाईच्या वेळी दोन्ही कर्मचारी सतर्क होत पसार झाल्याने त्यांचा शोध सुरू आहे.रमेश संपतराव खाडे,वय ३८ वर्षे,पद-सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन,भंडारा,(वर्ग-२) जि.भंडारा,मुळ पत्ता रा.बावची, ता.वाळवा,जि.सांगली व रवीकुमार बाबुराव आडे,वय ३८ वर्षे, पद-पोलीस शिपाई,ब.न.१४२३ (वर्ग-३)पोलीस स्टेशन,भंडारा,जि.भंडारा,ह.मु.मल्लेवार यांचे घरी भाडयाने नेहरु वार्ड मोहाडी,मुळ पत्ता रा.पेडगाव, ता.जि.हिंगोली अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,प्रकरणातील मुळ तक्रारदार हा २६ वर्षीय तरुण असून तक्रादाराविरुद्ध एका प्रकरणात भंडारा येथे महिंद्रा शोरुम बेला येथील वासनीक मॅडम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दिलेल्या तक्रारीवरुन रमेश खाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक व रवीकुमार आडे पोलीस शिपाई यांनी तक्रारदार यांना त्यांचे विरुध्द असलेल्या तक्रारीवर “तुला जेल मध्ये जावे लागेल,मोठी केस आहे,जेलमध्ये जायचे नसेल व केस लहान करावयाची असेल तर १० हजार रुपये लागतील,तुझेवर छोटी केस करुन घेतो” अशा प्रकारे तंबी देवून लाचेची मागणी केल्याची तक्रार २४ सप्टेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा येथे प्राप्त झाली होती.दरम्यान,त्याच दिवशी पोलीस स्टेशन, भंडारा येथे पडताळणी कार्यवाही करण्यात आली. कार्यवाहीदरम्यान,आडे यांनी तक्रारदारास तक्रारी संबंधाने “तेच ते कागद,तेच ते करशील तर ते स्टाप करल” म्हणजेच लाच रक्कम देशील तर केस स्टाप करल,असे बोलून स्वतःचे माबाईल फोनवरुन रमेश खाडे यांचे मोबाईल फोनवर फोन करुन तक्रारदार यांचे केस,लाचरक्कम संबंधाने बोलणी केली. तसेच तक्रारदार यांची सुध्दा बोलणी करुन देवून त्यांचे करिता १० हजार रुपयाचे लाचेची मागणी केली. त्यानंतर,रमेश खाडे यांनी तक्रारदार यांना “ठिक आहे. झालय सगळ ठिक आहे” असे बोलून तक्रारदार यांना त्याची मोठी कार्यवाही होणार नाही या करिता आस्वस्थ केले.तसेच तक्रारकर्त्यानी व्याजाने १० हजार रुपये आनले असल्याचे सांगितलेवर “ठिक आहे ठिक आहे”असे बोलून लाचेच्या मागणीस प्रोत्साहन देवून ती लाच रक्कम आरोपी रवी आडे यांचेकडे देण्यास सांगितले.कार्यवाही दरम्यान आरोपी रवी आडे यांनी उपस्थित पंच यांना रागामध्ये त्यांचे नाव,तसेच आधारकार्ड बाबत विचारणा करुन आतमध्ये बोलावले असता तक्रारदार व पंच घाबरले व तिथुन निघुन गेल्याने रवी आडे यांना संशय आला.त्यानंतर,बुधवारी सापळा कार्यवाही आयोजित करण्यात आली.पंरतु,पूर्वीच आडे यांना कार्यवाही संबंधाने संशय आल्याने ते पोलीस स्टेशन,भंडारा येथे हजर झाले नाही व तक्रारदार यांनी सापळा कार्यवाही दरम्यान दोघांनाही फोन केला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांनी फोन रिसीव्ह केला नाही.तर पोलीस शिपाई रवीकुमार आडे यांचा मोबाईल फोन बंद दाखवीत असल्याने सदर दोन्ही आरोपी यांना कार्यवाही संबंधाने संशय आल्याची खात्री झाल्याने दोन्ही आरोपी लोकसेवक यांचे विरुध्द पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कारवाई वेळी दोघेही फरार झाल्याने त्यांचा शोध सुरु आहे.
सदरची कारवाई दिगबंर प्रधान,पोलीस अधीक्षक लाप्रवि नागपूर,विजय माहुलकर अप्पर पोलीस अधीक्षक,लाप्रवि नागपूर,माधुरी बाविस्कर अप्पर पोलीस अधीक्षक,लाप्रवि नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोलीस उपअधीक्षक प्रविणकुमार पाटील,पोलीस हवालदार मिथुन चांदेवार,अतुल मेश्राम,पोलीस अंमलदार विष्णू वरठी व सुमेध रामटेके यांच्या पथकाने केली.
पर्यवेक्षण व सापळा अधिकारी:-प्रविणकुमार पाटील,पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,भंडारा मो.क्र.७०२०२१२०९२
- घटक कार्यालय👇
कार्यालय पोलीस उपअधिक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,सिव्हील लाईन,भंडारा,जिल्हा-भंडारा.
दूरध्वनी क्रमांक-०७१८४-२५२६६१
मो.क्रमांक- ८४३२२६१०६४
टोल फ्री क्रमांक-१०६४
- Advertisement -

