Sunday, September 20, 2026
Homeमुंबईचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीकडे भरधाव वेगाने जात असतांनाच एका बीएमडब्लू काळ्या रंगाच्या कारचा लाला लजपतराय कॉलेजसमोरील लोटस जेट्टीजवळ आज पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी भीषण अपघात झाला.कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार प्रथमतः मार्गावरील संरक्षण भिंतीला जोरदार धडकली आणि धाडकन कार पुलावरून हवेत उडून दुसऱ्या मार्गावर खाली कोसळली.यात कारचा अक्षरशः चुराडा होऊन कारचे चाक एकीकडे विखुरल्या गेले.या भीषण अपघातामध्ये कारमधील तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.शनाय गज्जल वय २१ वर्षे,धीर्या सेठ वय १७ वर्षे आणि सुमारे २५ वर्षीय  एक तरुण अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे असून,नायर रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.तर,कारमधील आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून मुंबई कोस्टल रोड हा दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हला वांद्रे-वरळी सी-लिंकच्या वरळी टोकाशी जोडणारा १०.५८ किमी लांबीचा हाय-स्पीड फ्रीवे आहे. मात्र,ज्या ठिकाणी अपघात घडला तो काही अंतरापर्यंत वळण मार्ग असल्याने वाहनाचा अत्यंत वेग हेच या अपघाताचे मुख्य कारण आहे.पहाटेच्या वेळी रस्ता मोकळा असल्याने कार अतिवेगात होती आणि लोटस जेट्टीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबवले.पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

उद्याला गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाची खरीप शिवार फेरी.. – एकाच ठिकाणी २२८ पीक वाण व तंत्रज्ञान शिफारशींची प्रात्यक्षिके व शास्त्रज्ञांशी थेट संवादाची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६...

आता प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव.. – डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकणाऱ्या दुकानदारांना बसणार चाप..

उद्रेक न्युज वृत्त :-आता देशातील प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.विशेष म्हणजे,भारताच्या सर्वोच्च औषध सल्लागार संस्थेने देशभरातील प्रत्येक केमिस्ट...

अवैध दारू विक्रेत्यांना दणका; देसाईगंज आणि आरमोरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील दारू विक्रेते तडीपार.. -देसाईगंजच्या कुरूड गावातील दारू विक्रेतीचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दारुबंदी असतांनाही राजरोसपणे अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात खरी,पण काही वेळातच घरी पाठवले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!