Wednesday, September 9, 2026
Homeगोंदियाकुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून मृत्यू झाला आहे.अश्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील गुमाधावडा येथे घरातील कुलरमध्ये पाणी भरतांना विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून एकाचवेळी दोघांचा मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.भाग्यवान हरीचंद बावणे वय ४४ वर्षे व त्यांची भाची सुप्रिया सुरेश सोनटक्के वय १० वर्षे अशी मृतकांची नावे आहेत.
सध्या पावसाने दडी मारल्याने दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर उकाडा वाढला आहे.घरातील पंखे गरम हवा फेकत असल्याने अनेकांनी कुलर सुरू केले आहेत. कुलरची हवा ही पाण्याविना गरम फेकत असल्याने त्यात पाणी भरणे आवश्यक असते. कुलरची थंड हवा लागावी म्हणून सुप्रिया आणि तिचे मामा भाग्यवान बावणे हे घरातील कुलरमध्ये पाणी भरत होते.पाणी भरत असतांना कुलर बंद होता.पण कुलरची पिन ही बोर्डमध्ये लावलेली असल्याने  कुलरच्या लोखंडी भागामध्ये विद्युत प्रवाह उतरला आणि दोघांनाही एकाचवेळी विजेचा जोरदार धक्का बसला.यात दोघांचाही घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सुप्रिया ही गुमाधावडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवीत शिकत होती. घटनेच्या दिवशी ती शाळेत गेली नव्हती,मात्र त्याच दिवशी तिच्यावर काळाने घाला घातला.सदरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावणारी असल्याने कुलरमध्ये पाणी भरतांना नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.विशेष म्हणजे,कुलरमध्ये पाणी टाकायचेच झाले,तर बोर्डातील कुलरची पिन काढूनच पाणी भरावे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!