Friday, August 28, 2026
Homeभंडाराविजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास पवनी तालुक्यातील भोजापूर शेतशिवार परिसरात घडली.अश्विन रघुनाथ लोणारे वय ४३ वर्षे, रा.कोसरा, ता.पवनी,जि.भंडारा असे मृतक कर्मचाऱ्याचे नाव असून ते महावितरण विभागामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते.सध्या ते पवनीला वास्तव्यास होते.पवनी तालुक्यातील भोजापूर येथील शेतशिवारातील विद्युत वाहिनीत काही तांत्रिक बिघाड झाल्याने आज गुरुवारच्या सकाळी अश्विन लोणारे हे बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेले होते.दरम्यान,सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास विद्युत वाहिनीची एबी स्विच करत असतांनाच त्यांना अचानकपणे विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेने लोणारे कुटूंबीय शोकसागरात बुडाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

किरण चौधरी “मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कारा”ने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दैनिक देशोन्नती "मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कार" व दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ सदरातून आपल्या लेखणीची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोलीतील किरण महादेव चौधरी यांच्या ‘लेखमंजिरी’...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!