Saturday, October 10, 2026
Homeकुरखेडाआमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप..

आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंधळी येथे आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले.यावेळी माजी सरपंचा उज्वला रायसिडाम,माजी उपसरपंच अप्रव भैसारे,माजी ग्रामपंचायत सदस्य पल्लवी पुसाम,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जितेंद्र कऱ्हाडे,काँग्रेस बूथ प्रमुख भास्कर पुसाम,काँग्रेसचे राजकुमार जनबंधू,महागू भानारकर, राजू बोदेले तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद तथा विद्यार्थी उपस्थित होते. आमदार मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागावा,या उद्देशाने सदरचा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मन लावून  शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आगामी काळात अन्न धान्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा महाराष्ट्र राज्यात पड़लेल्या भीषण दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतातील उभी पिके उद्धवस्त झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात...

तब्बल १२ लाखांहून अधिक हिवताप चाचण्या; हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे...

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!