- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार १० ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास घडली.
नेहमीप्रमाणे आज सोमवारच्या सकाळी मऱ्हेगाव येथील काही गुराखीगावा जवळच्या राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेले होते.उत्तरा थेर या देखील गुरे घेऊन जंगलात गेल्या होत्या.दरम्यान,परिसरातील वातावरणात अचानक बदल झाला आणि पावसासह विजांचा कडकडाट सुरू झाला.याचवेळेस उत्तरा थेर यांच्या जवळच वीज कोसळल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्या जागीच कोसळल्या.सदरचे दृश्य पाहून काही अंतरावर असलेल्या गुराखींनी मदतकार्य सुरू करून त्यांना पालांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र,डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून थेर कुटुंबियांवर दुःखाचे सावट पसरले आहे.
- Advertisement -

