Tuesday, September 22, 2026
Homeमुंबईमोठे कारण आले समोर..! तब्बल ९४ हजार शेतकरी कर्जमाफी योजनेतून बाद..

मोठे कारण आले समोर..! तब्बल ९४ हजार शेतकरी कर्जमाफी योजनेतून बाद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६’ अंतर्गत बुधवार २२ जुलै रोजी सर्वप्रथम ५३३ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती.या शेतकऱ्यांचे २ कोटी ९९ लाख ३७ हजार ५४० रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले होते.विशेष म्हणजे,जे शेतकरी आयकरमध्ये(इन्कम टॅक्स)बसत नाहीत,अश्या शेतकऱ्यांचीच पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती व आयकर विभागाकडून यादी येताच पात्र शेतकऱ्यांना पुढील लाभ देण्यात येणार असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले होते.अशातच आता कर्जमाफी योजनेसाठी सहकार विभागाने केलेल्या डेटा पडताळणीत तब्बल ९४ हजार ८३ शेतकरी आयकरदाते म्हणजेच आयकर भरणारे असल्याचे आढळून आल्याने सदरचे शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अपात्र ठरले आहेत.यामुळे राज्य सरकारची तब्बल १ हजार ८८१ कोटी रुपयांची बचत होणार आहे.तर दुसरीकडे, छाननीनंतर पात्र ठरलेल्या १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून उद्या,मंगळवार ४ ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरण(डीबीटी) प्रक्रियेद्वारे एकाच वेळी सुमारे ७ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात जमा केले जाणार आहेत.यासाठी शासनाने ३० जुलै २०२६ रोजी ७ हजार कोटी रुपयांच्या निधी वितरणास प्रशासकीय मान्यता दिली आहे.राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असून सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्यांचे पीक कर्ज थकीत आहे; अशा शेतकऱ्यांना २ लाख रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी दिली जाणार आहे.तर नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या २४ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!