Friday, July 31, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील उजळणी वर्ग,चर्चासत्र व नोंदणी मार्गदर्शन वर्ग उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या प्रशिक्षणामध्ये देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा व कोरची तालुक्यांतील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थित शिक्षकांना स्काऊट-गाईड चळवळीची उद्दिष्टे,अभ्यासक्रम,विविध उपक्रम,नोंदणी प्रक्रिया तसेच शाळास्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध कृतींबाबत सखोल आणि प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंजचे केंद्रप्रमुख  अंबाजी आमनार होते.तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका वंदना उसेंडी आणि मुख्याध्यापक  किशोर चव्हाण उपस्थित होते.
उजळणी वर्गामध्ये जिल्हा संघटक(स्काऊट)विवेक कहाळे,जिल्हा संघटक(गाईड)नीता आगलावे,कब मास्टर तथा मुख्याध्यापक खेमराज तिघरे,नितू मालाकार आणि साधना भुरसे यांनी विविध विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी कब मास्टर तथा मुख्याध्याप खेमराज तिघरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठेचे ए.एल.टी.प्रमाणपत्र व ‘Honourable Charge’ प्रदान करून गौरविण्यात आले.तसेच नितू मालाकार यांना ए.एल.टी.प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी दोन्ही प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पियुष नंदनवार आणि श्रीकृष्ण ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले. खेळीमेळीच्या वातावरणात अनुभवांची देवाणघेवाण, प्रात्यक्षिके आणि उपयुक्त चर्चांसह हा मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!