Monday, September 21, 2026
Homeदेसाईगंजमाझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे “माझा वाढदिवस-एक झाड” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळ व परिसर सौंदर्यीकरण विभागाच्या वतीने हा उपक्रम वर्षभर सातत्याने राबविला जाणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी आपल्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालय परिसरात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करतील.वृक्षारोपणासोबतच झाडांच्या नियमित देखभालीवरही विशेष भर दिला जाणार असून, पर्यावरण संरक्षणाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.श्रीराम गहाणे यांनी या उपक्रमाचे स्वागत करून सर्वांनी वाढदिवस साजरा करतांना निसर्गाला एक वृक्ष भेट देण्याचे आवाहन केले.निसर्ग मंडळ व परिसर सौंदर्यीकरण विभागाचे प्रमुख प्रा.डाॅ.निलेश हलामी यांनी या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसर अधिक हिरवेगार व पर्यावरणपूरक होण्यास मदत होईल,तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीची भावना विकसित होईल,असा विश्वास व्यक्त केला.
महाविद्यालयाने विद्यार्थी,पालक व नागरिकांना या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत आपले योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!