Tuesday, July 21, 2026
Homeवर्धाकारला ट्रकची ठोसर; भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू..!

कारला ट्रकची ठोसर; भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर विरूळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तब्बल सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.यात कारमधील एका कुटुंबातील चार सदस्य,ट्रकचा चालक आणि क्लीनर या सर्वांचा जागीच मृत्यू झाला.सदरची घटना आज सोमवारच्या सकाळी उघडकीस आली. अपघातात कार चालक अंकुश राऊत,राजेश आनंदराव टिपले,सुषमा राजेश टिपले,जान्हवी राजेश टिपले,सर्व रा.सालोड,ता.जि.वर्धा यांचा मृत्यू झाला. तसेच आयशर ट्रक चालक संजय कुमार,रा. धनाजीपूर,उत्तर प्रदेश आणि ट्रक क्लीनर समरजित पाल,रा.गडहरियनपूर,उत्तर प्रदेश यांचाही मृत्यू झाला.
टिपले कुटुंब आपल्या मुलीला उच्च शिक्षणासाठी पुण्यातील महाविद्यालयात सोडून एमएच ३२ वाय १४३९ क्रमांकाच्या कारने पुण्यावरून समृद्धी महामार्गाने मध्यरात्री परत येत होते.दरम्यान,विरुळ जवळ समृद्धी महामार्गावर तत्पूर्वीच नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर इथेनॉलचा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.त्यामुळे वाहने दुसऱ्या लेनवर टप्प्याटप्प्याने सोडली जात होती.या दरम्यान मागून भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार ट्रकखाली चिरडली गेली आणि क्षणातच ट्रकला आग लागली.या आगीत ट्रक चालक आणि क्लीनर यांचा होरपळून मृत्यू झाला,तर कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग सुरक्षा यंत्रणा, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.महामार्ग पोलीस अधिकारी सरिता यादव, पुलगावचे पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.आग आटोक्यात आणल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली.या भीषण अपघातानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!