Friday, August 14, 2026
Homeभंडाराविजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.तुमसर तालुक्यातील चारगाव-ढोरवाडा शेतशिवारात वीज कोसळल्याने शरद दवडू बुधे वय ४५ वर्षे,रा.ढोरवाडा यांचा मृत्यू झाला.तर त्यांचा मेहुणा महेश पांडुरंग फेंडर वय ३५ वर्षे,रा.मांडणगाव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सदरची घटना दोघेही शेतात काम करत असतांनाच अचानकपणे विजांचा चमचमाट होऊन वीज कोसळली.तसेच खापा येथे वीज कोसळल्याने ७० वर्षीय तुकडू चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्यावरही तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.यासह पवनी तालुक्यातील ब्रम्ही येथील श्रीकांत दिगंबर घावळे वय ३९ वर्षे यांचाही अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला.आज दुपारच्या सुमारास ते शेतातील कामे आटोपून घराकडे परत निघाले असता त्यांच्या अंगावर विज कोसळली.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

घोरपडींच्या शिकार प्रकरणी चौघांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावंगी बिटात दोन घोरपडींची शिकार करून त्यांचे मांस कापतांना चौघांना वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक करून घटनास्थळावरून...

दुचाकीची पीकअपला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू.. – देसाईगंजच्या कुरुड फाट्यावरील आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड फाटा बसस्थानक नजीक दुचाकीची समोरून येणाऱ्या पीकअपला जोरदार धडक बसल्याने घडलेल्या अपघातात २० वर्षीय...

परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम; गडचिरोलीतील स्टील हब व कौशल्य विकासाला चालना- उद्योगमंत्री उदय सामंत – ३६ हजार २११ कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याच्या...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याचे तसेच राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याचे आरोप चुकीचे आहेत. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर...

राज्य शासनाकडून स्वतंत्र ‘गडचिरोली प्रदेश’ घोषित.. – मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण,वाढत्या पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने संपूर्ण गडचिरोली महसुली जिल्ह्याचा समावेश असलेला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!