Friday, August 14, 2026
Homeचंद्रपूरघरून निघाला 'तो' परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त झाले आहेत. सुरेंद्र उर्फ गणेश चंपतराव कडुकर वय ५९ वर्षे, रा.श्रीनगर वार्ड प्रसन्न पेट्रोल पंप जवळ लालपेठ, कॉलरी क्र.०३ चंद्रपुर असे बेपत्ता असलेल्या इसमाचे नाव आहे.
नेहमी प्रमाणे सुरेंद्र कडुकर हे १७ जून २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास केस कटींगचे कामावर जाण्यासाठी घरून निघाले होते.तेव्हापासुन ते घरी परतलेच नसल्याने कुटुंबीयांनी  नातेवाईकांकडे,रेल्वे स्टेशन,बसस्टॅन्ड व पुणे येथे शोध घेतला.परंतु त्यांचा कुठेही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे,सुरेंद्र कडुकर यांच्या पत्नी वंदना कडुकर वय ५७ वर्षे यांनी चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार,पोलीस प्रशासन  सुरेंद्र कडुकर यांचा शोध घेत आहेत.मात्र,तब्बल दहा दिवसांपासून त्यांचा शोध लागलेला नाही.
बेपत्ता असलेल्या ईसमाचे नाव सुरेंद्र उर्फ गणेश चंपतराव कडुकर वय ५९ वर्षे,उंची-५ फुट ७ इंच बांधा मध्यम,रंग-सावळा,चेहरा गोल डोळे मध्यम,दाडी -मिसी बारीक पांढरी,केस काळे-पांढरे बारीक अंगात कपडे-फिकट किम रंगाचा त्यावर बारीक बुटटे असलेला शर्ट,फुल पँट निळ्या रंगाचा चष्मा घातलेला आणि पायात काळ्या रंगाची चप्पल घातलेला असून सदर पुरूष कुठेही आढळून आल्यास चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात तात्काळ कळविण्याचे आवाहन करण्यात आले.
  • संपर्क:-
चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन- ०७१७२-२५२२००
तपासी अंमलदार :- ८७६६९१५५३०
निखिल कडुकर :- ९६०४४६३१५७,९१५६१९०२७४
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीत उभारणार ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा विकास व संशोधन केंद्र’- मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत – झाडीबोली संमेलनासाठी दरवर्षी २५ लाखांचा निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मराठी भाषेचे संवर्धन,स्थानिक बोलीभाषांचे जतन-संवर्धन,संशोधन आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘मराठी भाषा विकास व संशोधन...

घोरपडींच्या शिकार प्रकरणी चौघांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावंगी बिटात दोन घोरपडींची शिकार करून त्यांचे मांस कापतांना चौघांना वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक करून घटनास्थळावरून...

दुचाकीची पीकअपला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू.. – देसाईगंजच्या कुरुड फाट्यावरील आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड फाटा बसस्थानक नजीक दुचाकीची समोरून येणाऱ्या पीकअपला जोरदार धडक बसल्याने घडलेल्या अपघातात २० वर्षीय...

परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम; गडचिरोलीतील स्टील हब व कौशल्य विकासाला चालना- उद्योगमंत्री उदय सामंत – ३६ हजार २११ कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याच्या...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याचे तसेच राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याचे आरोप चुकीचे आहेत. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!