- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
वर्धा :-एका बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी दुसऱ्या बँकेचा चेक दिला खरी, पण जो चेक देण्यात आला,त्या बँकेच्या खात्यात पुरेसे पैसेच नसल्याने चेक बाऊन्स म्हणजेच अनादरित झाला.या प्रकरणी वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.तसेच तक्रारदार संस्थेला ८० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. यासह नुकसानभरपाईची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे.आशीष रविकांत वाटकर रा.रामनगर वॉर्ड, हिंगणघाट,जि.वर्धा असे आरोपीचे नाव असून त्यांनी हिंगणघाट येथील ईरा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड येथून कर्ज घेतले होते.कर्जाची ७१ हजार ६७२ रुपयांची थकबाकी फेडण्यासाठी त्यांनी देना बँकेचा चेक संबंधित संस्थेला दिला होता.मात्र,संबंधित खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने चेक बाऊन्स झाला.त्यानंतर संबंधित पतसंस्थेने हिंगणघाट न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली.या प्रकरणात तक्रारदार संस्थेच्यावतीने ॲड.संदीप देवगिरकर यांनी बाजू मांडली. सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि युक्तिवाद ग्राहा धरत द्वितीय सहाय्यक अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी तथा वरिष्ठ स्तर न्यायाधीश ए.एच.सय्यद यांनी आरोपीला दोषी ठरविले व आरोपीला न्यायालयाने १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावत तक्रारदार संस्थेला ८० हजार रुपये नुकसानभरपाई अदा करण्याचे आदेश दिले.तसेच सदरची रक्कम न भरल्यास अतिरिक्त ३ महिने कारावासात राहावे लागेल,असे निर्णयात नमूद करण्यात आले.
- Advertisement -

