Friday, July 31, 2026
Homeचंद्रपूरगांजा तस्करी; दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..

गांजा तस्करी; दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-ओडिशा राज्यातून गांजाची खरेदी करून चंद्रपुरात विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या एका गांजा तस्कराच्या चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  आज,गुरुवार २३ एप्रिलच्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास शहराच्या कुंदन प्लाझा चौक परिसरात मुसक्या आवळल्या.शहादेव ठाकूरदास मलिक वय ५३ वर्षे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्याच्या ठाकूरनगर येथील रहिवासी असून हल्ली चंद्रपूर शहराच्या राष्ट्रवादी नगर परिसरात वास्तव्यास आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे दोन लाख रुपये किंमतीचा गांजा(८.०१५ किलो वजनाची गांजाची पाने,फुले व बिया)तसेच एक जुना इन्फिनिक्स कंपनीचा मोबाईल असा एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्यावर चंद्रपूर शहराच्या रामनगर पोलीस ठाण्यात अंमली औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क),२० (ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस प्रशासन करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले,सुनील गौरकार, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार,सतीश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार,दीपक डोंगरे,इम्रान खान,पोलीस अंमलदार हिरालाल गुप्ता,किशोर वाकाटे,शशांक बदामवार आदींनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!