Saturday, August 29, 2026
Homeभंडाराबाळ विक्री प्रकरणातील डॉक्टरच्या अडचणीत वाढ.. - अल्पवयीन मुलीची केली होती प्रसूती..

बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टरच्या अडचणीत वाढ.. – अल्पवयीन मुलीची केली होती प्रसूती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-बाळ विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ.नितेश वाजपेयी याने डिसेंबरमध्ये मोहदुरा येथील एका जोडप्याला बाळ विकल्याचे निश्चित झाल्यानंतर, भंडारा येथील महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने बाळाचा ताबा घेतला होता.डिसेंबर महिन्यात एका बाळाचा सौदा ४ लाख ७० हजार रुपयांत झाला होता.हे बाळ विकत घेणारे दाम्पत्य मूळचे मोहाडी तालुक्यातील मोहदुरा येथील होते.बाळ विक्रीचे प्रकरण गाजू लागल्याने अटकेच्या भीतीने हे दाम्पत्य नातेवाईकांकडे मोहगाव देवी येथे वास्तव्यास गेले होते.बाळाच्या विक्रीसाठी ४ लाख ७० हजार रुपये मोजण्यात आले.त्यापैकी,४ लाख रोख स्वरूपात,तर ५० हजार रुपये डॉक्टराच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने पाठविले.वरठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत मुख्य सूत्रधार डॉ.नीतेश वाजपेयी याच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.उपचाराच्या नावाखाली नवजात बालकांची विक्री करणाऱ्या या टोळीने आणखी किती बालकांचा सौदा केला; याचा तपास पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे करीत असतांनाच बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ.नितेश वाजपेयीच्या करामतीची आणखी एक कहाणी समोर आली आहे,यामुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.डिसेंबरमध्ये मोहदुरा येथील एका जोडप्याला विकलेल्या बाळाच्या जन्मदात्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून बाळाची आई ही अल्पवयीन असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कायद्यानुसार अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीबाबत पोलिसांना माहिती देणे बंधनकारक आहे.मात्र,आरोपी डॉ.वाजपेयीने ती माहिती दडवून ठेवली आणि छत्तीसगड राज्यातील त्या अल्पवयीन मुलीची प्रसूती गोंदिया येथील न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये केली होती.न्यू बालाजी हॉस्पिटल हा डॉ.वाजपेयीचाच असल्याने त्याच्या करामतीची भनक कुणालाही लागलेली नव्हती.प्रकरणी गोंदियाच्या रामनगर पोलिस ठाण्यात डॉ.वाजपेयीवर पोक्सोच्या कलम ४,६,८ आणि २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामुळे आरोपी  डॉ.वाजपेयीच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून आता न्यायालयाकडून त्याला जामीन मिळणे अवघड  आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे तब्बल १० सराईत गुन्हेगार तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर येत  नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या...

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!