Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजधानाचे चुकारे रखडले; धान खरेदी रखडली.. - शेतकरी आत्महत्येची वाट पाहताय कां?...

धानाचे चुकारे रखडले; धान खरेदी रखडली.. – शेतकरी आत्महत्येची वाट पाहताय कां? आमदार मसराम यांचा सरकारला सवाल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-बऱ्याच महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या धान विक्रीचे चुकारे रखडले.त्यातच, शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली; पण अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांची धान खरेदी झालेलीच नसल्याने संतप्त होत आमदार रामदास मसराम यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.वारंवार पत्रव्यवहार करून,पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत, “शेतकरी आत्महत्या करण्याची वाट पाहणार काय?” असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी धान विक्री करून दोन ते तीन महिने लोटले आहेत.मात्र,अद्यापही चुकारे जमा झाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.बियाणे, खत,कर्जफेड आणि घर खर्चासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
आमदार मसराम यांनी अधिवेशनादरम्यान हा प्रश्न जोरकसपणे मांडणार असल्याचे सांगितले. “तत्काळ धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.यासोबतच जिल्ह्यासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणीही त्यांनी केली.सध्याचे उद्दिष्ट अपुरे असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी अडचणी येत असल्याचे त्यांनी नमूद केले.शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी आमदार मसराम यांनी केली आहे.दरम्यान,प्रशासनाकडून लवकरच निधी उपलब्ध होऊन चुकारे जमा होतील,असे आश्वासन देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अद्यापही कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!