Sunday, October 25, 2026
Homeभंडाराबाळ विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉक्टरचा जीवन संपविण्याचा प्रयत्न; स्वतःवरच केले ब्लेडने...

बाळ विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉक्टरचा जीवन संपविण्याचा प्रयत्न; स्वतःवरच केले ब्लेडने वार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-एका गरीब दाम्पत्याच्या दहा दिवसांच्या मुलीला ‘नागपूरला मोफत उपचार करून देतो’ असे खोटे आमिष दाखवून,३ फेब्रुवारी रोजी तिचा दोन लाख रुपयांत सौदा करण्याचा प्रयत्न उघडकीस आला होता. डॉक्टर बाजपेयी हा गोंदियातील ‘न्यू बालाजी हॉस्पिटल’ चा संचालक आहे.या संपूर्ण रॅकेटचा तो मुख्य सूत्रधार आहे.या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.डॉक्टर बाजपेयी याच्या अटकपूर्व जामिनावर येत्या,मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार होती.मात्र,अटकेच्या धास्तीने त्याने सुनावणीच्या तीन दिवस आधीच स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.या घटनेमुळे पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.डॉक्टर नीतेश बाजपेयी काल शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी कटंगी येथून स्वतःच्या वाहनाने भंडाऱ्याच्या दिशेने निघाला होता.प्रवासादरम्यान त्याने स्वतःजवळ असलेल्या ब्लेडने शरीरावर आणि पोटावर गंभीर वार करून घेतले.रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या डॉक्टराला तातडीने तुमसर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडाऱ्यातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून,सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.भंडारा पोलिस आता डॉक्टर बाजपेयी याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची वाट पाहत आहेत.या आत्महत्येच्या प्रयत्नामागे केवळ भीती आहे की आणखी काही गुपिते दडलेली आहेत? याचा तपास आता पोलिस करणार आहेत.
  •  काय आहे प्रकरण?
सोमवार,२ फेब्रुवारी रोजी भंडारा येथील महिला आणि बाल विकास विभागाच्या हेल्पलाइनच्या बाल टोल-फ्री क्रमांक-१०९८ वर एक कॉल आला.पांढरबोडी येथे एकटी राहणाऱ्या मालती वाघमारे या महिलेकडे १० दिवसांचे बाळ असल्याची माहिती त्यावरून मिळाली. चौकशी केली असता,तिच्यासोबत नवजात बाळ आढळले.ते गोंदियाहून दत्तक घेऊन आणल्याचे तिने सांगितले.तिला कागदपत्र घेऊन वरठी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असता ती गेली नाही.त्यामुळे पोलिसांनी घरी भेट दिली असता घराला कुलूप लावून ती चारचाकी वाहनाने पळून गेल्याची माहिती पुढे आली.त्या वाहनाचा पाठलाग करून मोहाडी येथील कुशारी क्रॉसिंगवर वाहन थांबविले.त्यात पूर्णिमा धुर्वे ही महिला बाळासह आढळली.अधिक चौकशी केली असता, गोंदियातील डॉक्टरकडे सफाईसाठी नोकरीस असून, त्यांच्या सांगण्यावरून आपण या बाळाला तिकडे घेऊन जात असल्याचे सांगितले.या घटनाक्रमानंतर हे प्रकरण उघड झाल्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ८०, ८१,तसेच १४३ (४),१३७ (२)नोंदवून वरठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर,लालेश्वरी नंदकिशोर सदेपाच वय ३९ वर्षे,रामनगर,गोंदिया हिला अटक करण्यात आली व गोंदियातील मुख्य सूत्रधार डॉक्टर बाजपेयी तसेच बाळ खरेदी करणारी महिला मालती प्रकाश वाघमारे वय ४४ वर्षे,रा.पांढरबोडी, ता.भंडारा तसेच पूर्णिमा सतीश धुर्वे वय ३० वर्षे आणि उमेशसिंग रामचंद्रसिंग गेहलोत वय ४८ वर्षे,दोघेही गोंदिया येथील रहिवासी हे सर्वजण फरार झाले होते. बाळाचे पालक गोंदियातील आहेत.बुधवार,४ फेब्रुवारी रोजी,ते बाल कल्याण समितीपुढे हजर झाले असता,हे त्यांचे तिसरे मूल असून,अशक्तपणामुळे उपचारासाठी गोंदियातील डॉक्टरकडे दाखल केले होते.उपचारांचा खर्च जास्त असल्याने,तुमचे बाळ नागपूरला एका सामाजिक संस्थेच्या मदतीने पाठवित असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात ते वरठीतील महिलेला विकून डॉक्टरांच्या सहकारी लालेश्वरी व मालती यांनी बालिकेच्या पालकाच्या खात्यात चेकद्वारे आणि रोख रक्कम जमा केल्याचे तपासात आढळून आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यू; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारच्या सायंकाळी सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट...

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!