- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-चंद्रपूर महानगरपालिकेत काहींनी घेतलेल्या गोपनीय निर्णयामुळे काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे.चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे गटाने भाजपला अचानक दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपने सत्तास्थापन करत आपला महापौर बसवला.त्यामुळे,भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौर झाल्या.सर्वात जास्त काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असल्याने काँग्रेचा महापौर बनेल,अशी अनेकांची मनधारणा झाली होती. मात्र,राजकारणाची सूत्रे वेगळीच जुळल्याने गणित फिस्कटला आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.अश्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा केला आहे.वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आदेश दिले होते.शहराध्यक्ष म्हणून मी नगरसेवक लता साव व लहू मरसकोल्हे काँग्रेसलाच मतदान करण्याच्या सूचना केल्या होत्या. मतदानाच्या काही वेळापूर्वी दोन्ही नगरसेवक वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे सोबत होते.मी काही वेळासाठी बाहेर गेल्यानंतर ते नगरसेवकही आम्ही ठेवलेल्या ठिकाणी नव्हते.तसेच दोन्ही नगरसेवकांनी आपले भ्रमणध्वनी बंद करून ठेवले आणि मतदानासाठी उपस्थित झाले नाही.याचे खापर आमच्यावर फोडत कार्यकारिणी बरखास्त करून पक्षातून काढण्यात आले आहे.उद्धवसेना शेवटपर्यंत भाजपसोबत जाणार नाही, काँग्रेससोबतच जाणार,असे आश्वासन उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गीऱ्हे देत होते.मात्र,निवडणुकीच्या ऐनवेळेवर ते भाजपसोबत कसे काय गेले? याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना नाही.माझे पद गेले तरीही मी शेवटपर्यंत वंचितसोबतच राहणार,असे स्नेहल रामटेके यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
- Advertisement -

